शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा बँक घोटाळा भोवला; माजी आमदार विवेक पाटील यांना अटक, ED चा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 06:47 IST

कर्नाळा बँकेकडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारांतून गेल्या काही वर्षांत ५२९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई / पनवेल : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली. रात्री त्यांच्या निवासस्थानी छापा मारून ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कर्नाळा बँकेकडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारांतून गेल्या काही वर्षांत ५२९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी दोषीवर कारवाई व्हावी, यासाठी दीर्घकाळ आंदोलन केले होते. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने सहकार खाते, स्थानिक तपास यंत्रणेसह ईडीकडे तक्रार करण्यात आली. 

पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता. त्यानंतर प्रमुख संशयित, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर ईडीकडून मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणेच्या रडारवर होते. त्यांची वाहने व मालमत्तेवर ईडीने यापूर्वीच टाच आणली असून गुंतवणूक असलेली विविध बँक खाती सील केली आहेत. 

न्यायालयाकडून अटक टाळण्यापासून संरक्षण न दिल्याने त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मुंबई ईडी झोन-२चे सहायक संचालक सुनील कुमार यांनी मंगळवारी रात्री त्यांना रायगड येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारn पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले.n कर्नाळा बँकेत ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवी आहेत. यामध्ये पनवेल, उरणमधील स्थानिकांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत.  n महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाईपासून वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चेदेखील काढले होते.

टॅग्स :Vivek Patilविवेक पाटीलfraudधोकेबाजीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय