शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Kanpur Voilence : बाबा बिर्याणीचा मालक ताब्यात, जफरला रसद पुरवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:28 IST

Kanpur Voilence : एवढेच नाही तर शत्रूची मालमत्ता आणि प्राचीन मंदिराचा काही भाग बळकावून बिर्याणीचे दुकान उघडण्याच्या प्रकरणातही बाबा बिर्याणीचे नाव आले आहे.

कानपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी बाबा बिर्याणी या प्रसिद्ध रेस्टॉरंटचा मालक मालक मुख्तार बाबा याला ताब्यात घेतले आहे. मुख्तार बाबाने हिंसाचाराचा मुख्य आरोपी गया जफर हयात हाश्मीला रसद पुरवल्याचा पोलिसांचा दावा आहे. मुख्तार बाबावर अनेक गुन्हे दाखल आहेत. लवकरच SIT हिंसाचारातील आणखी आरोपींना अटक करू शकते.

तपास यंत्रणांच्या चौकशीदरम्यान हिंसाचाराचा मास्टरमाइंड जफर हयात हाश्मी याने अनेक मोठी नावे समोर आणली होती. त्यापैकी एक, बाबा बिर्याणीचे नाव क्राउडफंडिंगशी संबंधित होते. बाबा बिर्याणीने दगडफेकीसाठी बोलावलेल्या लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आणि पैसे देण्यात मदत केली. एवढेच नाही तर शत्रूची मालमत्ता आणि प्राचीन मंदिराचा काही भाग बळकावून बिर्याणीचे दुकान उघडण्याच्या प्रकरणातही बाबा बिर्याणीचे नाव आले आहे.काय आहे कानपूर हिंसाचार?3 जून रोजी कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर गोंधळ झाला होता. दोन समुदाय आमनेसामने आले आणि काही वेळातच हिंसाचार झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. येथील दुकाने बंद करण्यावरून वाद झाला. या घटनेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. या प्रकरणात सातत्याने धक्कादायक खुलासे होत आहेत. हिंसाचारात दहशतवाद्यांनी पेट्रोल बॉम्बचाही वापर केला. तपासाअंती असे आढळून आले की, हिंसाचाराच्या आधी पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी करण्यात आले होते.वादाची सुरुवात कशी झाली?भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याने वाद सुरू झाला. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या लोकांनी कानपूरमध्ये बाजार बंद पुकारला होता. यादरम्यान दुकाने बंद करण्यावरून गदारोळ झाला, त्यानंतर हिंसाचारही झाला. नंतर भारतीय जनता पक्षाने नुपूर यांची पक्षातून निलंबित केले होते.57 जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहेयाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ एफआयआर नोंदवले आहेत. आतापर्यंत ५७ जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मुख्य आरोपी जफर हयात आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी कानपूर कारागृहातून इतर जिल्ह्यातील कारागृहात हलवले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशstone peltingदगडफेक