शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

१७ राज्यात फसवणूक, परदेशात नेटवर्क, २०० FIR...; गँगचा पर्दाफाश, मास्टरमाइंड आठवी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:29 IST

शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कानपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कानपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गँग आठवी पास झालेला तरुण चालवत होता. या गँगचं जाळं देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलं आहे. परदेशातही त्यांचं मोठं नेटवर्क आहे. 

शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून हे भामटे देशभरात आपलं जाळं पसरवत होते. या गुंडांनी कानपूरच्या एका व्यावसायिकाशी टेलिग्रामवर संपर्क साधून ट्रेडिंगच्या नावाखाली अडीच कोटी रुपये उकळले होते. फसवणूक करणाऱ्यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाचे पैसे दुप्पट-तिप्पट केल्याचा दावा केला होता. 

देशातील अनेक नागरिकांची या गँगने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. देशभरात २०० हून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे, मात्र या गँगचे सदस्य पहिल्यांदाच पकडले गेले आहेत. या गुंडांनी कानपूरमधील सिव्हिल लाइनमध्ये राहणाऱ्या विनोद कुमार यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून शेअर्समध्ये पैसे वाढवण्याचे आमिष दाखवले होते. या ग्रुपवर खोटी माहिती देण्यात येत ​​होती. शेअर्समध्ये पैसे गुंतवून त्यांचे पैसे दुप्पट-तीनपट झाले.

ग्रुपमधील इतक्या लोकांच्या कमेंट्स बघून विनोदही जाळ्यात अडकला. टोळीच्या सांगण्यावरून त्याने हळूहळू १.७८ कोटी रुपये गुंतवले. पण मधल्या काळात अकाऊंट बंद झालं. त्यांचा मोबाईल नंबरही बंद येऊ लागला. त्यानंतर विनोदने पोलिसांत तक्रार केली. सायबर सेलने तपास सुरू केला असता ही गँग भोपाळ येथील रोहित सोनी नावाचा तरुण चालवत असल्याचं आढळून आलं. 

पोलिसांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना कळालं की, १७ राज्यातील २५० हून अधिक लोक या गँगच्या जाळयात अडकले आहेत.  बळी ठरले आहेत. तसेय या गँगविरुद्ध २३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण गँगमधील लोक कधीच पकडले गेले नाहीत. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहित सोनी, अक्षय, मयंक मीणा या लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कारसह मोबाईल, लॅपटॉप, राऊटर, हार्डडिस्क जप्त केली आहे. हे लोक मध्य प्रदेश आणि बिहारचे रहिवासी आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसा