शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

लखनऊमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचे कानपूर कनेक्शन, एटीएसने ४ संशयितांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 22:01 IST

ATS Arrested Terrorist in Lucknow : साथीदारांचा शोध सुरू आहे

ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने छापा टाकून रात्री उशिरा चार ते पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.लखनऊमधून दोन दहशतवाद्यांना अटक झाल्यानंतर कानपूर पोलीस हाय अलर्टवर आहेत.

कानपूर - उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एटीएसने अल कायदा समर्थित अन्सार गजवतुल हिंद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना लखनऊमधून अटक केली आहे. एटीएसच्या या कारवाईने एक मोठा कट उधळून लावला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी मसीरुद्दीन आणि मिनहाजचे अनेक साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांचे कानपूरचे कनेक्शन समोर येत आहे. एटीएसच्या अनेक पथकांनी शहरातील चमनगंज, जाजमऊ, नई सडक, मचारिया यासारख्या ठिकाणी तळ ठोकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने छापा टाकून रात्री उशिरा चार ते पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसला कानपूरच्या संरक्षण संस्थांचे नकाशे मसिरुद्दीन आणि मिनहाज यांच्याकडून मिळाले आहेत. यासह हे दोघेही कानपूरला आले. शहरातील विविध ठिकाणी भेट दिली. एटीएसच्या चौकशीदरम्यान त्यांचे साथीदार कानपूर येथे असल्याचे समजले असून ते मसीरुद्दीन आणि मिनहाजसाठी काम करतात. कानपूरशी संबंधित माहिती ते दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवतात. हे दोन्ही अतिरेकी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते.लखनऊमधून दोन दहशतवाद्यांना अटक झाल्यानंतर कानपूर पोलीस हाय अलर्टवर आहेत. कानपूर सेंट्रल स्टेशन, बसस्थानक यासह शहरातील प्रमुख ठिकाणी रविवारी रात्री तपासणी मोहीम राबविण्यात आली. संशयास्पद वाहनांची तपासणीही केली जात आहे. यासह शहरात प्रवेश करणार्‍या वाहनांवरही नजर ठेवली जात आहे.कानपूर दहशतवादी घटना२१ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट २००० रोजी आर्यनगरमध्ये पहिला कुकर बॉम्ब फुटला होता. आयएसआय एजंट इम्तियाज याला ११ सप्टेंबर २००९ रोजी सचेन्डी येथून अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर दुसरा आयएसआय एजंट वकास याला २७ सप्टेंबर २००९ रोजी बिथूर येथून अटक करण्यात आली होती. १८ सप्टेंबर २०११ रोजी एटीएसने रेहमान उर्फ ​​गद्दूला रेल्वे बाजारातून अटक केली. रेहमान हा आयएसआय एजंट होता, तो पाकिस्तानला माहिती पाठवत असे. पाटणा स्फोटातील संशयितास एटीएसने १४ एप्रिल रोजी पांकी स्थानकातून अटक केली होती.२०१७ मध्ये, इसिसच्या दहशतवाद्यांचा खोरासन विभाग उघडकीस आला. एटीएसने १४ सप्टेंबर २०१८ रोजी हिज्बुल मुजाहिद्दीनचा करुझमा उर्फ ​​कमरुद्दीन याला जाजमऊ येथून अटक केली होती.

 

टॅग्स :terroristदहशतवादीUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकAnti Terrorist Squadएटीएस