शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला खुश करण्यासाठी कारची चोरी, पण पहिल्याच राइडमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 09:27 IST

kanpur boyfriend stole car for ride with girlfriend arrested : प्रेयसीने कारमधून फिरण्याची इच्छा व्यक्त केली असता प्रियकराने चक्क कारची चोरी केली.

कानपूर : आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी उचललेले पाऊल प्रियकराला चांगलेच महागात पडले. या प्रेयसीने कारमधून फिरण्याची इच्छा व्यक्त केली असता प्रियकराने चक्क कारची चोरी केली. मात्र, प्रेयसीसोबत पहिल्याच राइडमध्ये त्याची चोरी पकडली गेली. पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या एका मित्राला अटक करून तुरुंगात पाठवले. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील ही घटना आहे. (kanpur boyfriend stole car for ride with girlfriend arrested)

दरम्यान, राहुल असे या प्रियकराचे नाव आहे. त्याने आपल्या प्रेयसीला कारमधून फिरवण्यासाठी फतेहपूर येथून कारची चोरी केली. मात्र, त्याने कारचा नंबर बदलला नाही. दुसरीकडे फतेहपूरमध्ये कार मालकाने पोलिसांना कारची चोरी झाल्याचे कळवले. राहुल ज्यावेळी त्याची प्रेयसी आणि एका मित्रासह चाकेरी महामार्गावरून जात होता, त्यावेळी कारचा नंबर पाहून पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी कारमध्ये राहुलची प्रेयसी आणि त्याचा एक मित्र होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने त्याचा मित्र फिरोजसोबत फतेहपूर येथून स्विफ्ट कारची चोरी केली. कारचे मालक रामस्वरूप यांनी फतेहपूरमध्ये गुन्हा दाखल केला. यावेळी फतेहपूर पोलिसांनी कानपूर पोलिसांना माहिती दिली. ज्यावेळी राहुल हा फिरोज आणि त्याच्या प्रेयसीसोबत कारमधून जात होता, त्यावेळी पोलिसांनी कारचा नंबर पाहून थांबविली आणि त्यांना पकडले. 

तपासादरम्यान, राहुल आणि फिरोज हे गाझीपूरचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. राहुलने त्याच्या प्रेयसीला कारमधून फिरवण्यासाठी चोरी केल्याचे सांगितले. दुसरीकडे, राहुलच्या प्रेयसीला कार चोरीची असल्याचे माहित नव्हते. तिने पोलिसांना सांगितले की, राहुलने चोरीची कार आणली होती, हे मला माहित नव्हते. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलीची सुटका केली. मात्र, दोन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी