शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 11:00 IST

Corona Vaccine: बनावट लसीकरण प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबई: कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, मुंबईतील बनावट लसीकरणाच्या प्रकरणाने राज्यसह देशभरात खळबळ उडवून दिली. बनावट कोरोना लसीकरणाप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले असल्याचे सांगितले जात आहे. या बनावट लसीकरणात नागरिकांना चक्क मिठाचे पाणी दिले गेल्याचे समोर आले आहे. (in kandivali fake vaccination racket residents get saline water dose in place of corona vaccine)

कोरोना प्रतिबंधक लसीच्याऐवजी मिठाचे पाणी (सॅलाइन वॉटर) देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, बनावट लसीकरण केलेल्या सर्वांची अँटीबॉडी टेस्ट केली जाईल. तसेच या नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचे डोस देण्यात येतील. 

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय; आमदार अतुल भातखळकरांचे टीकास्त्र

बोगस लसीकरणातील मास्टरमाइंडची शरणागती

कांदिवली बोगस लसीकरणातील मास्टरमाइंड डॉ. मनीष त्रिपाठी याचा जामीन दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी हे बोगस लसीकरण करण्यात आले होते. 

कोविनवर डेटा उपलब्ध नाही

बनावट लसीकरणादरम्यान एका केंद्रात ३९० जणांना १२६० रुपये दर आकारून लस देण्यात आली. मात्र, त्यासंदर्भात कोणतीही माहिती कोविन अॅपवर अद्ययावत केली गेली नाही. बनावट लसीकरण प्रकरणात आतापर्यंत सुमारे २०४० लोकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. 

“जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?”; ‘त्या’ प्रकरणावरुन भाजपचा थेट सवाल

दरम्यान, बनावट कोरोना लसीकरणाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. काही घोटाळेबाज पैसे कमवाण्याच्या दृष्टीने लोकांच्या जीवाशी खेळत होते. सरकारने अशा घटनांची चौकशीची करुन अहवाल सादर करावा. या रॅकेटमधून कोरोनाकाळात लोकांची फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधणाऱ्यांचा तपास करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. लसीकरणात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकाने गंभीर दखल घ्यावी आणि तपासात उशीर करू नये. राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने फसवणूक किंवा बनावट लसीकरण मोहिमांच्या घटना टाळण्यासाठी धोरण तयार करावे. जेणेकरून कोणत्याही निष्पाप लोकांना त्रास होणार नाही. सर्वांत दुर्दैवी भाग म्हणजे कोरोनाच्या काळातही लोक त्रस्त आहेत आणि काही लोक फसवणूक करत आहेत. हे अकल्पनीय आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई