चेक बाउन्सप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 05:33 PM2019-08-28T17:33:19+5:302019-08-28T17:39:42+5:30

४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कल्याण न्यायालयाचे न्या. आर. पी. शिंदे यांनी दिले.

Kalyn court has Ordered to pay compesation in chaque bouncing case | चेक बाउन्सप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश

चेक बाउन्सप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देफिर्यादी प्रवीणतर्फे अ‍ॅड. मनोज खर्डे यांनी तर प्रतीकतर्फे अ‍ॅड. दर्शन सावंत यांनी काम पाहिले.कल्याण न्यायालयात २०१५ मध्ये दावा दाखल करण्यात आला होता.

कल्याण - चेक  बाउन्सप्रकरणी प्रतीक नंदकुमार पुण्यार्थी (रा. कल्याण) याला कोर्ट उठेपर्यंत एक दिवसाच्या शिक्षेसह ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कल्याण न्यायालयाचे न्या. आर. पी. शिंदे यांनी दिले.
फिर्यादी प्रवीण अरविंद काबाडी (रा. कल्याण) आणि प्रतीक हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. व्यवसाय करायचा असल्याने प्रतीकने काबाडी यांच्याकडुन ३ लाख रुपये २०१४ साली घेतले होते. परफेडीसाठी प्रतीकने दिलेला धनादेश वटला नाही. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रतीक याच्याविरुद्ध कल्याण न्यायालयात २०१५ मध्ये दावा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रतीक याला कोर्ट उठेपर्यंत एक दिवसांच्या शिक्षेसह ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. फिर्यादी प्रवीणतर्फे अ‍ॅड. मनोज खर्डे यांनी तर प्रतीकतर्फे अ‍ॅड. दर्शन सावंत यांनी काम पाहिले.

Web Title: Kalyn court has Ordered to pay compesation in chaque bouncing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.