शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan : नेवाळी 'प्रॉपर्टी' फसवणूक प्रकरण; पोलिसांनी केली 'कोट्यधीश' आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 23:07 IST

चाळ बांधून घरे देतो असं सांगत आरोपीनं केली होती अनेकांची फसवणूक. २०१४ मध्ये फसवणूकीचं प्रकरण अतिशय गाजलं होतं, त्यानंतर दाखल करण्यात आले होते गुन्हे.

ठळक मुद्देचाळ बांधून घरे देतो असं सांगत आरोपीनं केली होती अनेकांची फसवणूक.२०१४ मध्ये फसवणूकीचं प्रकरण अतिशय गाजलं होतं, त्यानंतर दाखल करण्यात आले होते गुन्हे.

मयुरी चव्हाणकल्याण नजीक असलेल्या नेवाळी परिसरातील भारतीय नौदलाच्या ताब्यातील जमिन आहे. यावर अनधिकृत बांधकाम करुन त्यावर चाळी बांधून देतो व विकतो असे भासवत अनेक गरीब लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी २०१४ साली कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात होते. याप्रकरणातला पडद्यामागचा प्रमुख सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला असून थेट नवी मुंबईतूनपोलिसांनी त्याला अटक केली आहे. माजीद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख (रा.घाटकोपर) असे या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या ७ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार झाला होता. विशेष बाब म्हणजे न्यायालयाने जाहीरनामा काढून त्याच लखनऊ येथील सुमारे पावणे दोन कोटींच घर जप्त करून लिलावाचे आदेश देऊनही माजिद अली हजर झाला नव्हता. अखेर कल्याण क्राईम ब्रान्चने या 'कोट्यधीश' आरोपीला अटक केली आहे. 

माजिद अली हा नवी मुंबई नजीक असलेल्या कामोठे परिसरात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार क्राईम ब्राँचने याबाबत खात्री केली आणि माजिद अलीचा सध्याचा फोटो प्राप्त करून सापळा त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण एम.दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कमळकर, साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे,मंगेश शिर्के यांच्या टीमने याप्रकरणी महत्वाची भूमिका बजावली आहे. 

माजिद अलीवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन, तर उत्तर प्रदेश येथील जिल्हा गोंडामधील खोडारे पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. नेवाळी येथील जमिनींवर अनधिकृतप बांधकाम करून फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी  एकाला न्यायालयाने ३ वर्षे, तर दुसऱ्या आरोपीला ५ वर्ष शिक्षा सुनावली होती. आता माजिद अली या मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत असून फसवणूकीचे अनेक प्रकार पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कशा पद्धतीने करायचा फसवणूक? नेवाळी परिसरातील नौदलाच्या जागेवर विविध कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने लोकांना चाळी बांधून देतो आणि विकतो असे सांगत माजिद अली व त्याच्या साथीदारांनी अनेक गरीब लोकांची फसवणूक केली होती. २०१४ मध्ये हे प्रकरण चांगलंच गाजलं होत. अनेक फसवणूकीचे प्रकार पुढे आले होते. यापैकी महात्मा फुले पोलीस ठाण्यात देखील दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. कल्याण क्राईम ब्राँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा यांनी दिलेल्या माहितीनुसार  माजीद अली उर्फ गुड्डू हा एका व्यक्तीला कंपनी स्थापन करायला लावायचा. मग ही व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला सोबत घेऊन  बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा करायची. मग हे पैसे  गुड्डूपर्यंत पोहचवण्याचं काम केलं जायचं. अशा प्रकारे माजिद अली हा पडद्यामागे राहून सर्व सूत्र सांभाळत होता. इतकेच नाही तर कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली त्याने अनेक बनावट ऑफिसदेखील उभे केले होते. 

माजिद अलीला कशी केली अटक? हा आरोपी स्वत:च्या नावाने सिम कार्ड, बँक खाते इत्यादी कोणत्याच गोष्टी वापरत नव्हता. त्यामुळे त्याला पकडणं पोलिसांना कठीण जात होतं. मात्र गोपनीय सूत्रांकडून पोलीसांना माजिद अली हा कामोठे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस