शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 17:02 IST

Kalyan Marathi Girl Assault Case: कल्याणच्या न्यायालयात गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा या दोघांनाही पोलिस कोठडी

Kalyan Marathi Girl Assault Case: कल्याण शहरातील नांदिवली भागात एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली होती. एका रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतील पुरूषाने बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आरोपी गोकुळ झा (Gokul Jha) हा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला फरफटत नेताना दिसला. त्याला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज कल्याणच्या न्यायालयात गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा या दोघांना हजर करण्यात आले असता, दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आणखी वाचा: VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण

नेमके प्रकरण काय?

बुधवारी दिवसभर कल्याण मारहाण प्रकरण गाजले. कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने किरकोळ वादानंतर मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता. गोपाल झा नावाचा माणूस आपली वहिनी अनन्या झा, तिचा पती रणजीत झा आणि गोकुळची आई यांच्यासोबत डॉक्टरांना भेटण्यासाठी आला आणि त्याने त्याला ताबडतोब भेटण्याचा आग्रह धरला. रिसेप्शनिस्ट मुलीने त्याला वारंवार समजावून सांगितले आणि वाट पाहण्याची विनंती केली. पण गोकुळ झा ऐकत नव्हता. त्याने आपला राग व्यक्त केला आणि मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले की सुरुवातीला तो पुरूष त्या तरूणीच्या पोटात लाथ मारली. नंतर आरोपी मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर खेचले. यादरम्यान तो तिला अनेक वेळा मारहाण करताना दिसला. हे दृश्य अत्यंत भयानक होते. पाहा व्हिडीओ-

आणखी वाचा: "मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम

कल्याण प्रकरणात नवा ट्विस्ट

मारहाणीचा प्रकार व्हायरल झाला. त्यानंतर एक वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला. या मारहाणीच्या घटनेआधी एक वेगळाच प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. सर्वात आधी गोकुळ झा आणि काही मंडळी तेथील मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीशी वाद घालत होते. त्यानंतर गोकुळ झा याने रिसेप्शन काऊंटरवर लाथ मारली. त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या मराठी तरूणीने आधी फाईल फेकली. त्यानंतर तिने रागाने पुढे येऊन तेथील एका महिलेला चपराक लगावली. त्यानंतर तो वाद चिघळला आणि पुढे गोकुळ झा याने त्या तरूणीला मारहाण केली.

दरम्यान, घडलेल्या प्रकारात गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा या दोघांना न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस या प्रकरणात सर्व अँगलने तपास करत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीmarathiमराठीhospitalहॉस्पिटलViral Videoव्हायरल व्हिडिओ