कल्याण - महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या हद्दीत सोनसाखळी चोरीची एक घटना घडली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे याच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपास सुरू केला. या तपासादरम्यान सराईत गुन्हेगाराला अँटी रॉबरी स्कॉडने बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे कोणताही ही पुरावा नसताना या गुन्हेगाराला अटक करण्यात यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.मलंग सय्यद शेख असे या सोनसाखळी चोराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 16 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करत महात्मा फुले पोलीस स्टेशन 2, खडकपाडा 1, बाजारपेठ 1 असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मलंग व त्याचा साथीदार फिरोज या दोघांविरोधात मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
कल्याण अँटी रॉबरी स्कॉडची कामगिरी; सराईत सोनसाखळी चोर गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 20:59 IST
विशेष म्हणजे कोणताही ही पुरावा नसताना या गुन्हेगाराला अटक करण्यात यश
कल्याण अँटी रॉबरी स्कॉडची कामगिरी; सराईत सोनसाखळी चोर गजाआड
ठळक मुद्देमलंग व त्याचा साथीदार फिरोज या दोघांविरोधात मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 1 लाख 16 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत