हुंडा नावाच्या राक्षसाने पुन्हा एकदा एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा बळी घेतला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील दीघा परिसरातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूनंतर सासरच्यांनी घाईघाईने तिचा मृतदेह दफन केला. मात्र, माहेरच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रशासनाच्या उपस्थितीत कब्र खोदून मृतदेह बाहेर काढला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लग्नानंतर ८ महिन्यांतच करुण अंत
मिळालेल्या माहितीनुसार, आसमा खातून नावाच्या तरुणीचे लग्न अवघ्या ८ महिन्यांपूर्वी मोहम्मद तौफीक याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. तौफीक याने तीन लग्ने केली असून, आसमा ही त्याची दुसरी पत्नी होती. संशयास्पद मृत्यूनंतर सासरच्यांनी कोणालाही कल्पना न देता मृतदेहाचे दफन केले, ज्यामुळे संशय बळावला.
व्हॉट्सॲप व्हिडिओने उघड केला 'तो' क्रूर चेहरा
आसमाच्या माहेरच्यांना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॉट्सॲपवर एक धक्कादायक व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओमध्ये आसमाचा पती आणि सासरचे लोक तिला अमानुषपणे मारहाण करताना दिसत होते. हा व्हिडिओ पाहून हादरलेल्या नातेवाईकांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली आणि आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला.
दोन दिवसांनंतर मृतदेह कब्रिस्तानातून बाहेर
परिजनांच्या तक्रारीची दखल घेत दीघा पोलिसांनी कारवाईचे चक्र फिरवले. दोन दिवसांपूर्वी दफन केलेला मृतदेह दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला. आसमाचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
तिसरी पत्नी आणि हुंड्याची मागणीमृतक महिलेचे मामा मो. ऐनुल हक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तौफीकचे हे दुसरे लग्न होते, पण तो तिसऱ्या लग्नासाठी आणि हुंड्यासाठी आसमाचा छळ करत होता. पोलिसांनी आरोपी पती मोहम्मद तौफीक याला बेड्या ठोकल्या असून सासरच्या इतर मंडळींचा शोध सुरू आहे.
Web Summary : A bride of eight months was allegedly murdered for dowry. Her in-laws secretly buried her in Patna. Following a complaint, police exhumed the body for autopsy, arresting the husband. Investigation underway.
Web Summary : आठ महीने की दुल्हन की दहेज के लिए हत्या का आरोप है। ससुराल वालों ने चुपचाप उसे पटना में दफना दिया। शिकायत के बाद, पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए निकाला, पति को गिरफ्तार किया। जांच जारी है।