शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:57 IST

Fraud Marriage Crime News: पोलिसांना का यावं लागलं, हॉस्पिटलमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

Fraud Wife Crime News: राजस्थानातील जोधपूरमध्ये बिहारमधील एका वधूने मोठा राडा केला. तिने पहिल्यांदा पैसे घेऊन एका तरुणाशी लग्न केले. सुहागरात झाल्यानंतर दोन दिवसांनी वराला तिचे गुपित कळताच वधूने त्याला खोलीत बंद केले. ती तिथून पळून जाऊ लागली. वधूने तिच्या साडीचा दोर बनवला आणि बाल्कनीला बांधला, नंतर साडीच्या मदतीने उडी मारली. त्यात तिचे दोन्ही पाय तुटले. त्यामुळे ती पोलिसांना सापडली. रुग्णालयात तिची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा पोलिसही चक्रावले. हे प्रकरण बनड पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे भरत नावाच्या तरुणाने लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याने २३ वर्षीय सुमन या तरुणीसह ६ जणांवर गंभीर आरोप केले आहेत. (Looteri Dulhan News)

दोन मुलींची स्थळं आली...

भरतने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत लिहिले आहे की, त्याच्या वडिलांना नंदकिशोर सोनी या व्यक्तीने २७ जूनला फोन केला. त्यानंतर त्याच्या ओळखीने संदीप शर्मा आणि रवी नावाच्या दोन ओळखीच्या लोकांनी दोन मुली आणल्या. एकीचे नाव सुमन आणि दुसरीचे नाव रुबी पांडे होते. त्यांनी सुमनला पसंत केले.

३ लाखांचे लग्न

त्यांना सांगण्यात आले की लग्नासाठी ३ लाख रुपये द्यावे लागतील. कारण या लग्नाचा खर्च खूप जास्त असेल. त्यांनी १ लाख ७० हजार रोख आणि १ लाख ३० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. भरत आणि सुमनचे आर्य समाज लग्न झाले. पण २ दिवसांनी भरतला सुमनचं खरं रूप समजलं की, ती लोकांना लग्न करून फसवून पळून जाते.

पतीला खरं कळताच वधू पळाली पण...

भरत तिला जाब विचारत असतानाच सुमनने त्याला खोलीत बंद केले आणि साडीच्या मदतीने बाल्कनीतून उडी मारली. पण नेमके तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे ती पळू शकली नाही. रवी आणि संदीप तिला मदत करण्यासाठी तिथे उभे होते. पण मी आरडाओरडा केल्याने घरचे जागे झाले. त्यानंतर रवी आणि संदीप वधूला सोडून पळून गेले आणि भरतच्या कुटुंबातील सदस्यांनी सुमनला पकडले.

दुखापत होऊनही अतिशहाणपणा सुरूच

सुमनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण इथेही तिचा अतिशहाणपणा सुरुच आहे. चौकशीत ती सतत आपल्या वडिलांचे नाव बदलत आहे. चौकशीत असे आढळून आले की ती आधीच विवाहित होती. लग्नाच्या वेळी तिने न्यायालय आणि आर्य समाजाला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तिने स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले आणि सर्व कागदपत्रे खोटी होती. त्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आली. सध्या इतर सर्व आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस