शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

JNU : उर्वशी चुडावालाला हायकोर्टाचा दिलासा; अटक झाल्यास जामिनावर सुटका करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:53 IST

एलजीबीटीक्यूच्या कार्यक्रमादरम्यान जेएनयूचा विद्यार्थी शारजील इमाम याच्या समर्थनार्थ देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा गुन्हा

ठळक मुद्देअटक केल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आझाद मैदान पोलिसांना हायकोर्टाने अंतरिम आदेश दिले आहेत. शरजीलने देशविरोधी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत, चुडावालाने त्याला समर्थन देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती.

मुंबई - देशद्रोहाचा आरोप असलेल्या उर्वशी चुडावाला याला मुंबई हायकोर्टकडून आज अंतरिम दिलासा मिळाला आहे. अटक केल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आझाद मैदान पोलिसांना हायकोर्टाने अंतरिम आदेश दिले आहेत. एलजीबीटीक्यूच्या कार्यक्रमादरम्यान जेएनयूचा विद्यार्थी शारजील इमाम याच्या समर्थनार्थ देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आलेल्या उर्वशी चुडावाला हिला अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाने मागील सुनावणीदरम्यान दिलासा देण्यास नकार दिला होता. ५ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सत्र न्या. प्रशांत राजवैद्य यांनी उर्वशी चुडावाला (२२) हिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला होता. याविरोधात चुडावाला हिने हायकोर्टाने धाव घेतली. आपण एका समुदायाच्या विरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी घोषणा दिली, असा आरोप आपल्यावर आहे. आपली घोषणा एका विशिष्ट समाजाच्या लोकांना आवडली नाही, याचा अर्थ आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद चुडावाला हिचे वकील विजय हिरेमठ यांनी न्यायालयात केला. परंतु, न्या. शिंदे यांनी तिला तुर्तास अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत तिच्या याचिकेवर पुढील सुनावणी आज ठेवली होती. आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. 

JNU : उर्वशी चुडावालाला अटकेपासून तुर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

पोलीसांच्या म्हणण्यानुसार, एलजीबीटीक्यूने गेल्या आठवड्यात आझाद मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनात चुडावाला हिने मोठमोठ्याने घोषणा दिली. ‘शरजील तेरे सपनो को हम मंजिल तक पहुचायेंगे,’ अशा घोषणा तिने दिल्या. शरजीलने देशविरोधी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत, चुडावालाने त्याला समर्थन देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. देशाचा शत्रू असलेल्या व्यक्तीला तिने पाठिंबा दिला. पोलिसांनी तिच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले. मात्र, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ती पोलीस ठाण्यात गेलीच नाही. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवित शरजील इमाम याने दिल्लीच्या जामिया मिलीया विद्यापीठात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला गेल्या महिन्यात अटक केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयjnu - jawaharlal nehru universityजेएनयूArrestअटकPoliceपोलिस