शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

JNU Attack : मुंबईत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 22:00 IST

फ्री काश्‍मीरचा बॅनर दाखवणाऱ्या तरुणीविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल

ठळक मुद्दे फ्री काश्‍मिरचा बॅनर दाखवणारी मेहेक प्रभु या तरुणीविरोधात भां. द. वि. कलम १५३ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुवर्णा साळवे, फिरोज मिठीबोरवाला, उमर खालीद यांच्यासह ३१ आंदोलकांवर दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर आणि शिक्षकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया आणि हुतात्मा चौक येथे काही जणांनी आंदोलन छेडले होते. मात्र, पोलिसांची परवानगी न घेतल्याने कायदा व सुव्यवस्थेला अडसर निर्माण केल्याप्रकरणी कुलाबा आणि माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए मार्ग) पोलिसांनी प्रत्येकी दोन - दोन गुन्हे आंदोलकांविरोधात दाखल केले आहेत.

JNU Attack : एफटीआयआय ते पुणे विद्यापीठ निषेध रॅली

फ्री काश्‍मीरचा बॅनर दाखवणाऱ्या तरुणीविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी सांगितले. तसेच कुलाबा पोलीस ठाण्यात गेट वे ऑफ इंडिया येथे परवानगीशिवाय बेकायदेशिररित्या जमाव केल्याप्रकरणी सुवर्णा साळवे, फिरोज मिठीबोरवाला, उमर खालीद व इतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय फ्री काश्‍मिरचा बॅनर दाखवणारी मेहेक प्रभु या तरुणीविरोधात भां. द. वि. कलम १५३ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ नाशकात ‘सम्यक’ची निदर्शने

तिसरा गुन्हा हा एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात सुवर्णा साळवे, फिरोज मिठीबोरवाला, उमर खालीद यांच्यासह ३१ आंदोलकांवर दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनकर्त्यांनी हुतात्मा चौकापासून गेटवेपर्यंत विनापरवानगी मोर्चा काढला होता. तर चौथा गुन्हा हुतात्मा चौकात निदर्शने केल्यामुळे एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :jnu attackजेएनयूMumbaiमुंबईPoliceपोलिस