शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत झाली वाढ; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:10 IST

कायद्यानुसार तीन वर्षांचा तुरुंगवास होण्याची शक्यता?

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विशेष अधिवेशन पार पडले. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे विधान केले. आमदार आव्हाडांनी हिंदू समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने वरील वादग्रस्त विधान केल्याची तक्रार भाजप प्रदेश उद्योग आघाडी महिलाध्यक्ष सेजल कदम यांनी केली होती. त्या तक्रारीवरून आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

वादग्रस्त विधानानंतर आव्हाडांविरोधात तीव्र नाराजी उमटण्यास सुरुवात झाली. यामध्ये राजकीय संघटनाच नाही तर धार्मिक संघटनांनी त्या वादग्रस्त विधानाबाबत आव्हाडांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे आली. यासाठी पोलिस ठाण्यात संघटनांनी धावही घेतली होती. आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटाने निषेधार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी वेळीच धाव घेत त्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

तीन वर्षांचा तुरुंगवास?

कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने बोलून किंवा लिखित स्वरूपात किंवा चिन्हांद्वारे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या, तर भारतीय दंड विधानाच्या कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो, तसेच त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिस