शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जिया खान आत्महत्या प्रकरण; सीबीआयच्या विशेष पथकाला अभिनेता सूरज पांचोलीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 10:53 IST

Jiah Khan suicide case: दिवंगत अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या विशेष पथकाची नेमणूक करावी अशी मागणी करणारा अर्ज जियाची आई राबिया खान यांनी उच्च न्यायालयात केला. मात्र, या अर्जाला अभिनेता सूरज पांचोलीने विरोध केला आहे.

मुंबई : दिवंगत अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या विशेष पथकाची नेमणूक करावी अशी मागणी करणारा अर्ज जियाची आई राबिया खान यांनी उच्च न्यायालयात केला. मात्र, या अर्जाला अभिनेता सूरज पांचोलीने विरोध केला आहे. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सूरजवर आहे. 

जिया खान आत्महत्येचा तपास आधी मुंबई पोलिसांकडे होता. त्यानंतर राबिया खान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला. सीबीआयनेही जिया खानने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर राबिया यांनी पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय अंतर्गत विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे. एसआयटीने पूर्णवेळ केवळ याच प्रकरणावर काम करावे, अशी मागणी राबिया यांनी याचिकेद्वारे केली आहे. ही मागणी वैध आहे. कारण घटना घडून बराच काळ लोटला आहे, असा युक्तिवाद राबिया यांच्यावतीने ॲड. शेखर जगताप यांनी केला. राबिया यांच्या याचिकेवर पांचोलीने उत्तर दाखल केले आहे. ‘विशेष न्यायालयाने ३० जानेवारी २०१८ मध्ये आरोप निश्चित केले आहेत आणि आतापर्यंत १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आलेली आहे. राबिया यांचीही साक्ष नोंदविली आहे. हा खटला अंतिम टप्प्यात आला असून, याचिकेतील मागण्या मान्य केल्या तर न्यायपूर्ण ठरणार नाही. तथ्यहीन याचिका दाखल करून खटल्यास विलंब करणे, हेच राबिया यांचे एकमेव उद्दिष्ट आहे, असे सूरजने दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे. एसआयटी स्थापन करण्याची विनंती राबिया यांनी पहिल्यांदाच केलेली नाही. त्यांनी २०१६ मध्येही  अशीच मागणी करणारी याचिका दाखल केली होती आणि उच्च न्यायालयाने ती फेटाळली होती, असे म्हणत सूरजने राबियांच्या याचिकेला विरोध केला व याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली. 

सीबीआयच्या उत्तराकडे लक्ष सीबीआयतर्फे ॲड. संदेश पाटील यांनी राबियांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुदत मागितली.  सीबीआयच्या भूमिकेबाबत न्यायालयाने विचारणा केली असता पाटील यांनी सांगितले की, तपास सुरू असल्याने पुढील तपासाची मागणी अयोग्य ठरत नाही.  सीबीआय हा निर्णय कदाचित न्यायालयावर सोपवेल.  सीबीआयने उत्तर दाखल केल्यावरच  त्यांच्या भूमिकेबाबत चित्र स्पष्ट होईल, असे पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी