शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद स्थितीत खोलीत आढळले युवक आणि महिला; घरच्यांनी बाहेरून टाळा लावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 11:45 IST

शुक्रवारी रात्री महिलेच्या खोलीतून एका युवकाचा आवाज ऐकून घरात सासू, नणंद आणि दीर जागा झाला.

ठळक मुद्देजेव्हा ते महिलेच्या खोलीत पोहचले तेव्हा त्या महिलेला एका युवकासोबत लज्जास्पद अवस्थेत पाहिलंगावकऱ्यांनी या दोघांना रुममधून बाहेर काढलं. संधी मिळताच युवकाने पळण्याचा प्रयत्न केला. या दोघांना गावकऱ्यांनी झाडाला बांधून चप्पलांचा हार घातला. रात्रभर महिला आणि युवक गावकऱ्यांच्या ताब्यात होते

गिरीडिह – गिरीडिह जिल्ह्यातील बेंगाबाद परिसरातील गावात गावकऱ्यांनी एका महिलेला आणि युवकाला अश्लिल वर्तवणूक करताना पाहिलं. त्यानंतर गावकऱ्यांनी या दोघांना बांधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी गावकऱ्यांचा आक्रोश पाहून त्या दोघांना वाचवण्यासाठी पोलिसांना प्रचंड धडपड करावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री महिलेच्या खोलीतून एका युवकाचा आवाज ऐकून घरात सासू, नणंद आणि दीर जागा झाला. जेव्हा ते महिलेच्या खोलीत पोहचले तेव्हा त्या महिलेला एका युवकासोबत लज्जास्पद अवस्थेत पाहिलं. त्यानंतर घरातील लोकांनी बाहेरून टाळा लावून गावकऱ्यांना बोलावलं. गावकऱ्यांनी या दोघांना रुममधून बाहेर काढलं. संधी मिळताच युवकाने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली.

या दोघांना गावकऱ्यांनी झाडाला बांधून चप्पलांचा हार घातला. रात्रभर महिला आणि युवक गावकऱ्यांच्या ताब्यात होते. त्यानंतर सकाळी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांच्या रागासमोर पोलिसांना काहीच करता आलं नाही. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतही युवक आणि महिलेला गावकऱ्यांनी सोडलं नव्हतं. पकडलेला युवक हा शेजारील धावाटांडचा गावचा रहिवासी होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आसपासच्या गावकऱ्यांनीही गर्दी केली. सकाळपर्यंत मोठ्या संख्येने लोक हत्यारांसह त्याठिकाणी उपस्थित होते. गावकऱ्यांनी या दोघांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. परिस्थिती चिघाळत असताना पोलिसांना वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थली डीएसपी संजय कुमार राणा, एसडीओपी अनिल सिंह, सीओ पोहचले. सध्या या युवकाला आणि महिलेला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आत्ताच काही सांगता येत नाही. परंतु पोलिसांच्या सुरक्षेत या दोघांना ठेवलं आहे.

टॅग्स :Policeपोलिस