रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीला बेडरूमध्ये दिसली अज्ञात महिला; हाणामारीसह हायव्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 01:23 PM2021-07-28T13:23:54+5:302021-07-28T13:24:14+5:30

पतीच्या बेडरुममध्ये अज्ञात महिला दिसताच पत्नीचा पारा चढला; दोन महिलांमध्ये हाणामारी

jharkhand palamu daltonganj railway station government quarter unknown woman wife fighting beating police | रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीला बेडरूमध्ये दिसली अज्ञात महिला; हाणामारीसह हायव्होल्टेज ड्रामा

रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीला बेडरूमध्ये दिसली अज्ञात महिला; हाणामारीसह हायव्होल्टेज ड्रामा

Next

धनबाद: झारखंडच्या धनबाद रेल्वे विभागात येणाऱ्या डालटनगंज रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या सरकारी क्वार्टरमध्ये मंगळवारी दुपारी जोरदार राडा झाला. सरकारी निवासस्थानातील बेडरूममध्ये एका अज्ञात महिलेला पाहून रेल्वे अधिकाऱ्याची पत्नी संतापली. थोड्याच वेळात प्रकरण हमरीतुमरीवरून हाणामारीपर्यंत पोहोचलं. यानंतर रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

डालटनगंज रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या पीडब्ल्यूआयची पत्नी मुलाची कागदपत्रं घेण्यासाठी अचानक पतीच्या सरकारी क्वार्टरवर गेली. ती आत जाताच बेडरूममध्ये तिला एक अज्ञात महिला दिसली. तिला पाहून पत्नीचा पारा चढला. दोघींमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. याचं पर्यवसान पुढे मारामारीत झालं. दोन्ही महिलांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा सगळा प्रकार पाहून क्वार्टरच्या आसपास लोक जमा झाले. यानंतर अधिकाऱ्याची पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिनं पोलीस तक्रार दाखल नोंदवली.

पीडब्ल्यूआय आणि त्यांच्या पत्नीमध्ये १२ वर्षांपासून वाद सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांना दोन मुलं आहेत. मंगळवारी पीडब्ल्यूआयची पत्नी डालटनगंजला पोहोचली आणि थेट पतीच्या सरकारी क्वार्टरमध्ये शिरली. त्यावेळी तिथे तिला एक अपरिचित महिला दिसली. पत्नीनं तिच्याकडे विचारणा केली असता आपण अधिकाऱ्याचे नातेवाईक असल्याचं तिनं सांगितलं. यानंतर दोघींचा वाद झाला. त्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 

Web Title: jharkhand palamu daltonganj railway station government quarter unknown woman wife fighting beating police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.