शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचे वैरी! मारहाण होत असलेल्या बॉयफ्रेन्डला वाचवायला गेलेल्या गर्लफ्रेन्डचा मृत्यू, दोन्ही भावांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 13:06 IST

तरूणी आणि तरूण भेटण्यासाठी गावातील एका तलावाजवळ गेले होते. तिथे तरूणीच्या कुटुंबीयांनी दोघांना एकत्र पाहिलं आणि तिथेच तरूणाला मारहाण सुरू करण्यात आली.

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर आजही समाजात प्रेमाला सगळेच मान्य करत नाही. आजही खोट्या सन्मानासाठी प्रेम करणाऱ्या तरूण-तरूणींची हत्या केली जाते. अशीच एक घटना झारखंडच्या मडवा गावातून समोर आली आहे. इथे एका तरूणीच्या कुटुंबीयांनी तरूणीला आणि तिच्या प्रियकराला इतकी मारहाण केली की, यात तरूणीचा जीव गेला. तर तरूणाची हालत गंभीर आहे.

तरूणी आणि तरूण भेटण्यासाठी गावातील एका तलावाजवळ गेले होते. तिथे तरूणीच्या कुटुंबीयांनी दोघांना एकत्र पाहिलं आणि तिथेच तरूणाला मारहाण सुरू करण्यात आली. तरूणीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तरूणीच्या दोन भावांना हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. (हे पण वाचा : अरे देवा! प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या, मनाला चटका लावणारी लव्हस्टोरी)

चतरा जिल्ह्यातील एका कुटुंबाला आपल्या मुलीने प्रेम करणं इतकं खटकलं की, त्यांनी दोघांना बेदम मारहाण केली. तरूणाची स्थिती गंभीर आहे. तर तरूणीने यात जीव गमावला. दोघेही भेटण्यासाठी गावातील एका तलावाजवळ गेले होते. तिथे दोघांना तरूणीच्या कुटुंबीयांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ज्यानंतर तरूणीच्या भावांनी तरूणाला बेदम मारहाण सुरू केली. आपल्या प्रियकराला मारहाण होत असल्याचं पाहून तरूणी त्याला वाचवण्यासाठी गेली होती. अशात तिच्या डोक्यावर काठीचा जोरदार वार झाला. त्यामुळे तिचा जागेवर मृत्यू झाला.

तरूणीचा प्रियकर अंकित कुमार गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विवेक कुमार यादव घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी हत्येच्या आरोपात तरूणीचे भाऊ सुरज गंझु आणि जीवन गंझु यांना अटक केली.  

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी