शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:20 IST

गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीचे अधिकारी रिकव्हरी टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होते.

उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका फायनान्स कंपनीच्या एरिया मॅनेजरने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेहाजवळ ५ पानी सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं की, गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीचे अधिकारी त्याच्यावर रिकव्हरी टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होते. टार्गेट पूर्ण न केल्यास पगार कापण्याची धमकी देत ​​होते. या सगळ्याला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

नवाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील गुमनावारा पिछोर येथे राहणारा ४२ वर्षीय तरुण सक्सेना एका फायनान्स कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. वडील मेडिकल कॉलेजचे रिटायर्ड क्लार्क आहेत. आज सकाळी मोलकरीण घरी कामासाठी आली असता तिने तरुणला एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. पत्नी आणि मुलं दुसऱ्या खोलीत होती.

मोलकरणीने आरडाओरडा करून घरच्यांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांनी खोलीतील दृश्य पाहिल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला. पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांना मृत व्यक्तीजवळ ५ पानी सुसाईड नोट आणि लॅपटॉप सापडला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सुसाईड नोटनुसार फायनान्स कंपनीचे अधिकारी रिकव्हरी टार्गेट पूर्ण करण्यासाठी तरुणवर सतत दबाव टाकत होते. टार्गेट पूर्ण न केल्याने ते त्याला धमकावत होते. त्यामुळे तरुण दोन महिने खूप चिंतेत होता. याबाबत त्याने कुटुंबीयांनाही माहिती दिली होती.

मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तरुणने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मीटींग केली होती. अशा परिस्थितीत तरुणने गळफास लावून आत्महत्या केल्याने मीटींगदम्यान काय घडलं हा तपासाचा मुद्दा आहे.

तरुणचा भाऊ गौरव सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणवर कामासाठी खूप दबाव टाकला जात होता. जर टार्गेट साध्य झालं नाही तर त्याच्या पगारातून पैसे कापले जातील असं सांगितलं. भोपाळ येथून सकाळी सहा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांनी त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, त्यानंतर तरुणने हे पाऊल उचललं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश