शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींचे दागिने सापडले मध्य प्रदेशात; सीसीटीव्हीच्या आधारे शोध, मुख्य आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 07:37 IST

आरोपीने १ कोटी ४४ लाख रुपयांचे एकूण २ किलो ७३२ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे तसेच दागिने चोरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग :  मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेवरील खोपोली हद्दीत असलेल्या फूड माॅल पार्किंगमध्ये असलेल्या वाहनातून २ किलो ७३२ ग्रॅमचे दागिने व सोन्याची बिस्किटे चोरीला गेली होती. आरोपीने डम्प करून ठेवलेल्या जागेवरून मुद्देमाल मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीतील फरार मुख्य आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी याचा पोलिस शोध घेत आहेत.

आरोपीने १ कोटी ४४ लाख रुपयांचे एकूण २ किलो ७३२ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे तसेच दागिने चोरले होते. या गुन्ह्याचा तपास लवकर व्हावा, यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अधिकारी व पोलिस अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार केली होती. एका पथकामार्फत अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच बाहेरील राज्यांतील आरोपींच्या यादीतील गुन्हेगारांमध्ये शोध घेणे तसेच दुसऱ्या पथकामार्फत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्याचे काम सुरू होते.

असा लागला चोराचा ठावठिकाणा तपास पथकाला घटनास्थळवरील सीसीटीव्हीमध्ये संशयित आरोपींचे फोटो मिळाले होते. संशयित आरोपींच्या फोटोंच्या सहाय्याने तसेच गुप्त बातमीदारामार्फत असे गुन्हे करणारे आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील खैरवा येथील असल्याची माहिती मिळाली. या बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, पोलिस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे व प्रतीक सावंत असे पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाले.

साथीदाराने दिली चोरीची कबुलीn सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी हा मध्य प्रदेश येथे असल्याची खात्री झाली. त्यामुळे तत्काळ संशयित आरोपी पप्पू बाबू खान याच्या घरी छापा टाकला. n मात्र आरोपी तेथे नव्हता. त्याच्या घराची झडती घेतली असता, काहीच सापडले नाही. त्यानंतर आरोपीचा सख्खा भाऊ इस्माइल बाबू खान (२७)  याची चौकशी केली असता, त्याने पप्पू बाबू खान याने त्याच्या साथीदारांसह चोरी केल्याचे कबूल केले. n तसेच त्याच्याकडे ठेवण्यास दिलेली २.६८४ किलो ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे व दागिने असा मुद्देमाल पोलिसांना दिला.

टॅग्स :Goldसोनं