शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांची कलाकुसर; एक कोटीला फसवलेच मुंबई, ठाण्यातील दोन सराफांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:39 IST

सराफाने दागिने मूळ मालकाला अंधारात ठेवून परस्पर मुंबईतील सराफ राजेश जैन याच्याकडे गहाण ठेवून त्या बदल्यात ५० लाख रुपये घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली :  येथील ज्वेलर्स व्यावसायिक सुरेश सोनी यांनी ऑक्टोबरमध्ये १९१९ गॅम सोन्याचे एक कोटी पाच लाख ५४ हजार रुपये किमतीचे दागिने ठाण्यातील सुरेशकुमार जैन या सराफाकडे सफाई आणि कलाकुसरसाठी दिले होते. 

सराफाने दागिने मूळ मालकाला अंधारात ठेवून परस्पर मुंबईतील सराफ राजेश जैन याच्याकडे गहाण ठेवून त्या बदल्यात ५० लाख रुपये घेतले. या दोन्ही सराफांनी सोनी यांना सोन्याचे दागिने किंवा त्या बदल्यात पैसे देण्याचे नाकारल्याने मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

सोनी त्यांच्या ज्वेलर्समधील दागिने नेहमी ठाण्यातील सुरेशकुमार जैन यांच्याकडे सफाई आणि कलाकुसरसाठी द्यायचे. ऑक्टोबरमध्ये सोनी यांनी नेहमीप्रमाणे सोन्याचे दागिने सुरेशकुमार यांच्या ताब्यात दिले होते. महिनाभरात दागिने परत देतो, असे त्यांनी सोनी यांना सांगितले. अनेक दिवस उलटूनही दागिने परत करत नाहीत म्हणून सोनी यांनी दागिने परत करण्याचा तगादा लावला. यावर सुरेशकुमार यांनी आपले वडील आजारी आहेत. रुग्णालयात जावे लागते, अशी कारणे देत दागिने देण्यास टाळाटाळ केली. 

दागिने ६ महिन्यांसाठी गहाण ठेवले आणि...    दरम्यानच्या काळात सुरेशकुमार यांनी सोनी यांना न सांगता त्यांचे सोन्याचे दागिने मुंबईतील राजेश जैन या विक्री व्यवस्थापकाकडे सहा महिन्यांसाठी गहाण ठेवले.     त्या बदल्यात सुरेशकुमार यांनी राजेश यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले. सहा महिने उलटून सुरेशकुमार दागिने सोडविण्यासाठी येत नाहीत म्हणून राजेश यांनी सुरेशकुमार यांची वाट न पाहता ते दागिने मोडून टाकले.    सोनी यांनी सुरेशकुमार यांच्याकडे दागिने परत करण्याची मागणी लावून धरली. त्यावेळी त्यांनी आर्थिक अडचणीमुळे आपण दागिने राजेश यांच्याकडे गहाण ठेवल्याचे सांगितले.     राजेश यांच्याकडे चौकशी करता त्यांनी आपण दागिने मोडले असल्याचे त्यांना सांगितले. परत देतो असे सांगितले, मात्र दिले नाहीत.

टॅग्स :Goldसोनं