शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir: मध्यरात्री जबरदस्तीने मंदिरात घुसत होता पोलीस; दहशतवादी समजून सहकाऱ्याने गोळ्या झाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 13:32 IST

Jammu Kashmir Police: उत्तर काश्मीरचे डीआयजी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला त्याच्या वागण्यामुळे दहशतवादी समजून गोळी झाडली, यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. 

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. हंदवाडा पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलिसाने एका मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. परंतू तिथे मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दुसऱ्या पोलिसांनी त्याला दहशतवादी समजून गोळ्या झाडल्या. यामध्ये या पोलिसाचा मृत्यू झाला आहे. (Police died in firing by police on duty at Jammu kashmir.)

अजय धर असे या पोलिसाचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा तो जबरदस्तीने मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसाने त्याला तीन-चार वेळा थांबण्याचा इशारा दिला तसेच हटकले. परंतू अजयच्या कानात हेडफोन असल्याने त्याला ऐकू आले नाही. यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाला तो दहशतवादी असेल असे वाटले. तसेच हल्ला करण्यासाठी मंदिरात घुसत आहे असे वाटले. यामुळे संरक्षणासाठी त्याने त्याच्यावर गोळी झाडली.  

अजय खाली पडताच त्याला पोलिसांनी घेरले असता तो आपलाच पोलीस कर्मचारी असल्याचे लक्षात आले. तातडीने अजयला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतू, त्याचा मृत्यू झाला. उत्तर काश्मीरचे डीआयजी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला त्याच्या वागण्यामुळे दहशतवादी समजून गोळी झाडली, यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस