जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 07:08 PM2020-08-28T19:08:52+5:302020-08-28T19:14:15+5:30

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरूच ठेवले आहे.

In Jammu and Kashmir, two terrorists were killed in encounter with security forces | जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा 

जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा 

Next
ठळक मुद्दे शोपियानच्या किलोरा गावात सुरक्षा दलाला दहशतवादी लपवल्याची माहिती मिळाली होती.

जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहेत. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरूच ठेवले आहे.

शोपियानच्या किलोरा गावात सुरक्षा दलाला दहशतवादी लपवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या भागाला वेढा घातला. या दरम्यान, दहशतवाद्यांनी स्वत: ला वेढलेले पाहून सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर गोळीबार सुरू केला. यानंतर सैनिकांनी पुढाकार घेतला. चकमकीला सुरुवात झाल्यानंतर तासाभरात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे की, दोन दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. ऑपरेशन सध्या सुरू आहे.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक

Web Title: In Jammu and Kashmir, two terrorists were killed in encounter with security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.