शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली हिंसाचार प्रकरणी जामिया एल्युमिनाई असोसिएशनच्या अध्यक्षाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 21:51 IST

दिल्ली हिंसाचार प्रकरणी नामवंत यूनिवर्सिटी-कॉलेजमध्ये शिकलेल्या अनेक लोकांना अटक केली जात आहे.  

ठळक मुद्देयाआधी स्पेशल सेलने जमिया कॉर्डिनेशन कमिटीची मिडिया प्रभारी सफुरा जर्गरला (जी तीन महिन्यांची गरोदर आहे)  अटक केली होती. सफूराने गरोदर असल्याचे कारण पुढे करत जामीन मागितला होता. मात्र, कोर्टाने फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचार प्रकरणी जामिया एल्युमिनाई असोसिएशनचा अध्यक्ष शिफा-उर्रह्मानला अटक केली आहे.  दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी शिफा-उर्रहमानच्या मुसक्या आवळल्या. आता त्याची चौकशी करत आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणी नामवंत यूनिवर्सिटी-कॉलेजमध्ये शिकलेल्या अनेक लोकांना अटक केली जात आहे.  याआधी स्पेशल सेलने जमिया कॉर्डिनेशन कमिटीची मिडिया प्रभारी सफुरा जर्गरला (जी तीन महिन्यांची गरोदर आहे)  अटक केली होती. याव्यतिरिक्त मीरान हैदरला हिंसाचारात सामील झाल्याप्रकरणी अटक केली होती. या अटक दोघांवर यूएपीए कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. सफूराने गरोदर असल्याचे कारण पुढे करत जामीन मागितला होता. मात्र, कोर्टाने फेटाळून लावली आहे.त्याचवेळी, किरोड़ीमल कॉलेजचा माजी विद्यार्थी गुलफिसा फातिमा यांनाही हिंसाचाराच्या कटात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध युएपीए कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद यांच्यावरही दिल्ली हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणाची चौकशी विशेष पथक करत आहे. यापूर्वी आम आदमी पार्टी (आप) चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीच्या चांद बाग हिंसाचार प्रकरणात ताहीर हुसेन यांना अटक करण्यात आली होती. ‘आप’च्या माजी नगरसेवकावर आयबी कर्मचारी अंकित शर्माची हत्या केल्याचा आरोप आहे. ताहीर हुसेन यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. ताहीर हुसेन यांच्या घराच्या छतावर दगड आणि पेट्रोल बॉम्ब सापडले. येथून दगडफेकही करण्यात आल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता, ज्यामध्ये काही हल्लेखोर घराच्या छतावरून खाली दगड आणि पेट्रोल बॉम्ब टाकत होते. नंतर पोलिसांनी हे घर सील केले होते. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीArrestअटकPoliceपोलिसdelhiदिल्ली