शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

बालिका वधू फेम माही विजच्या कूकला अटक, दिली होती जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 20:37 IST

Crime News : माही विज हिच्या घरी संतोष यादव हा स्वयंपाकीचं काम करत होता.

मुंबई : टीव्ही अभिनेता असलेला जय भानुशाली आणि माही विज यांच्या घरी काम करणाऱ्या कूकला पोलीसांनी अटक केली आहे. या दोघींना आणि त्यांच्या दोन वर्षाची मुलगी ताराला या कूकने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या दोघांनी त्या कूकच्या विरोधात ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. संतोष यादव असं कूकचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

माही विज हिच्या घरी संतोष यादव हा स्वयंपाकीचं काम करत होता. या दोघांमध्ये पगारावरुन वाद झाल्यानंतर संतोष यादवने तिला आणि तिचा पती जय तसेच दोन वर्षाची मुलगी तारा हिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माही विजने या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली. 

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला होता आणि नंतर ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. आरोपीवर कलम ५०९ , ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 जून रोजी संध्याकाळी आयपीसीच्या कलमानुसार पोलिसांनी त्याला त्याच दिवशी अटक केली आणि 30 जून रोजी त्याला अंधेरी महानगर न्यायालयात हजर केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAndheriअंधेरीPoliceपोलिसArrestअटक