शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jahangirpuri Violence: जो पोलिसांसोबत राहून शांततेच्या गप्पा करायचा, तोच निघाला जहांगीरपुरी हिंसाचाराचा खरा 'मास्टरमाइंड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 15:56 IST

Jahangirpuri Violence: क्राइम ब्रांचने हजांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी तबरेज आलम याला अटक केली आहे.

Delhi Jahangirpuri Violence Case:दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तबरेज नावाच्या व्यक्तीला अटक केली. हिंसाचाराचा खरा सूत्रधार हाच तबरेज असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो पोलिस अधिकाऱ्यांसोबत फिरत असे. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून तो शांततेच्या गप्पा मारायचा. या भागातील शांतता समितीमध्येही तबरेजचा सहभागी होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तबरेज हा आधी AIMIM पक्षाचा सदस्य होता. नंतर त्यांने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी तो करत होता. जगांगीरपुरीमध्ये झालेल्या दगडफेक आणि हिंसाचारानंतर तबरेज पोलिसांसोबत राहून परिसरात शांतता आणि बंधुभाव राखण्याचे वक्तव्य करायचा. विशेष म्हणजे, तबरेजचा यापूर्वी झालेल्या दिल्ली दंगलीतही सक्रीय सहभाग असल्याचे काहींचे म्हणने आहे.

तबरेज घटनेचा मुख्य सूत्रधाराला परिसरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेचे नेतृत्वही तबरेजने केले होते. तबरेज खान यांनेच तिरंगा यात्रा काढण्यासाठी शांतता समितीकडे परवानगी मागितली होती. तबरेजचे उच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे व्हिडिओ आणि फोटोही समोर आली आहेत. पण, आता दिल्ली पोलिसांचे म्हणने आहे की, त्या घटनेनंतर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्यांची पहिली प्राथमिकता होती. पण, चौकशीत जो कुणी दोषी आढळले, त्याची गय केली जाणार नाही.

हिंसाचारात तबरेझची सक्रिय भूमिका?पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरीच्या दगडफेकीत तबरेजचा खूप सक्रिय सहभाग होता. दगडफेकीनंतर तबरेज पोलिसांसोबत फिरत राहिला. DCP उषा रंगराणी जहांगीरपुरी येथे पत्रकार परिषद घेत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो माईकवर परिसरातील पोलिस बंदोबस्त हटवण्याची विनंती करत होता. दुसर्‍या व्हिडिओ, जहांगीरपुरी पोलिस स्टेशनच्या बाहेरच आहे. अटक केलेलया आरोपींचे कुटुंबीय पोलिस स्टेशनच्या बाहेर जमले होते. तेव्हा तबरेज एका समाजातील कुटुंबीयांना पोलिस ठाण्याच्या बाहेर भडकावत होता. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिस