शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जगदीप थोरात खूनप्रकरणी वीस जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:04 IST

माजी आमदार प्रभाकर घार्गेंचा समावेश; आरोपींपैकी सहा जणांना अटक

ठळक मुद्देपडळ येथील खटाव-माण ॲग्रो प्रोसेस या साखर कारखान्यात प्रोसेसिंग मुख्य अधिकारी म्हणून जगदीप थोरात हे काम करत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवडूज : वडूज (जि.सातारा) : पडळ (ता. खटाव ) येथील खटाव-माण ॲग्रो प्रोसेस या साखर कारखान्यात कार्यरत असणारे प्रोसेसिंग मुख्य अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (वय ४०, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, त्यांचे बंधू संग्राम घोरपडे आदी २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून, यातील सहा जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनोज भीमराव घोरपडे, संग्राम भीमराव घोरपडे, सनी दयानंद क्षीरसागर, रणजित धनाजी सूर्यवंशी, शुभम राजेंद्र घाडगे, रोहित रामदास कोलुगडे यांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील संशयित सहा जणांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.‌

पडळ येथील खटाव-माण ॲग्रो प्रोसेस या साखर कारखान्यात प्रोसेसिंग मुख्य अधिकारी म्हणून जगदीप थोरात हे काम करत होते. जगदीप थोरात यांनी कारखान्यात नोकरी करत असताना साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून कारखान्याचे संचालक मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, प्रभाकर घार्गे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पी. ए. अंजनकुमार, अशोक नलवडे, शेडगे मामा व अनोळखी १० ते १२ जणांनी फायबर काठी, ऊस, सळी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हा प्रकार दि.१० मार्चला सायंकाळी घडला होता. यामध्ये थोरात गंभीर जखमी झाल्याने त्यांना कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना थोरात यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यानंतर थोरात कुटुंबीयांनी संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी केली. संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. याबाबत कुटुंबीयांचे जाबजबाबही पोलिसांनी घेतले. दरम्यान, थोरात यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याने कऱ्हाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी