शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिन, नोराला मिळालेल्या भेटवस्तू ईडी करणार जप्त; दोघी देणार सुकेशविरुद्ध साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 05:29 IST

जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही या दोघी अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या अत्यंत महागड्या वस्तू ताब्यात घेण्याची कारवाई ईडी लवकरच सुरू करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :जॅकलिन फर्नांडिसनोरा फतेही या दोघी अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या अत्यंत महागड्या वस्तू ताब्यात घेण्याची कारवाई ईडी लवकरच सुरू करणार आहे. सुकेश चंद्रशेखर याने चित्रपटात भूमिका देण्याची आश्वासने या दोघींना दिली होती. त्याने रॅनबॅक्सीच्या प्रमुखांच्या पत्नीचीही फसवणूक केली होती. त्या दोघी २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखरविरुद्ध साक्ष देण्यास तयार झाल्या आहेत.

सुकेशने नोरा फतेहीला महागडी कार तर, जॅकलिन फर्नांडिसला हेलिकॉप्टर दिले होते. त्यांना मोठ्या रकमाही देण्याचे त्याने ठरविले होते. जॅकलिनने हेलिकॉप्टर घेण्यास नकार दिला होता. मात्र नोराने त्याने दिलेली बीएमडब्ल्यू कार स्वीकारली होती. 

त्याने दोघींना काही पाळीव प्राणीही दिले होते. ते प्राणी ताब्यात घेणे शक्य नसल्याने ईडीने त्या प्राण्यांच्या किमतीएवढी त्यांची मालमत्ता वा वस्तू ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. या दोघींना सुकेश चंद्रशेखरची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नव्हती, असे त्यांच्या चौकशीतून आढळून आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच त्या साक्षीदार हाेणार आहेत. 

सुकेशने आम्हाला दिलेल्या सर्व भेटवस्तू आम्ही ईडीच्या ताब्यात द्यायला तयार आहोत, असे या अभिनेत्रींनी ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीच्या काळात सांगितले आहे. सुकेशप्रमाणे या दोघींना आरोपी का करीत नाही, असे विचारता ईडीचा अधिकारी म्हणाला.

आरोपी नव्हे, बळी

- ईडीने जॅकलिन व नोरा फतेही यांना वेळोवेळी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनी आम्हाला सहकार्य केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

- त्या दोघींना ज्या भेटवस्तू सुकेशने दिल्या, त्यासाठीचा पैसा कोठून आला, याची दोघींना माहिती नव्हती, त्यामुळे त्या आरोपी नसून, या प्रकरणातील बळी असल्याचे पोलिसांना चौकशीतून दिसून आले आहे. 

टॅग्स :Nora fatehiनोरा फतेहीJacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय