शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अबब...! किती ती बेहिशेबी मालमत्ता? नोटा मोजण्याची मशीनही पडली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 09:20 IST

ओडिशामध्ये मद्य उत्पादक कंपनीवर आयकर विभागाची कारवाई

भुवनेश्वर : आयकर विभागाने कथित करचुकवेगिरीच्या आरोपांवरून ओडिशास्थित मद्य उत्पादक कंपनी आणि काही संबंधित युनिटवर टाकलेल्या छाप्यात बुधवारी ५० कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त केली. तसेच ती जप्तीचा आकडा १००० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही रक्कम मोजण्यासाठी आणण्यात आलेली मशीनही नोटा मोजताना बंद पडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने देशातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीपैकी एक असलेल्या या कंपनीच्या कार्यालय व संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. ही कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. या ठिकाणी कोट्यवधीची रोकड पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले. प्रामुख्याने करचोरीच्या आरोपात ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  ही रोख एकाच ठिकाणाहून जप्त करण्यात आली की एकापेक्षा जास्त हे स्पष्ट झालेले नाही. 

ट्रकमधून नेली जप्त रोकड बुधवारी रात्री आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर जप्त केलेली रोकड मोठमोठ्या पिशव्या आणि पोत्यांतून बँकेत नेण्यासाठी ट्रकही मागविण्यात आला होता.

पैसे मोजण्याचेही अधिकाऱ्यांपुढे आव्हानकारवाईत जप्त करण्यात येणारी रोकड  १००० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ती मोजण्यासाठी आणलेली मशीनही बंद पडल्याने अधिकाऱ्यांना अडचण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोट्यवधीची करफसवेगिरीसंबंधित मद्य उत्पादक कंपनीने कोट्यवधी रुपयांच्या आयकरात फसवेगिरी केल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी ही कारवाई केल्यानंतर हे घबाड सापडल्याचे पुढे आले.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाड