शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी : उद्योगपती राज कुंद्रा यांची २ तासांपासून चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 1:36 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या चौकशीनंतर आता कुंद्रा यांची ईडी चौकशी करत आहे.

ठळक मुद्दे कुंद्रा यांची ईडी कार्यालयात गेल्या २ तासांपासून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.

मुंबई - इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी बॅलार्ड पियर येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात उद्योगपती राज कुंद्रा हे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास हजर झाले आहेत. कुंद्रा यांची ईडी कार्यालयात गेल्या २ तासांपासून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या चौकशीनंतर आता कुंद्रा यांची ईडी चौकशी करत आहे.इकबाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्ता प्रकरणी ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावले होते. राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आजच कुंद्रा यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागल्यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय उघड होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.इकबाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघब्रिंद्रासोबत एक व्यावसायिक करार केला होता. रंजित ब्रिंदा हा इकबाल मिर्चीसाठी काम करतो. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशिलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्या संदर्भातील माहिती हाती लागली आहे. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. दरम्यान, २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं आहे. मात्र, ४ नोव्हेंबर रोजी या व्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने राज कुंद्रा यांना समन्स जारी केले होते.

मिर्चीच्या वरळी येथील सीव्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन येथील १५३७ चौरस मीटर मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. या प्रकरणात ईडीने मिर्चीचे सहकारी हारून आलम युसूफ, रिंकू देशपांडे आणि रणजितसिंग बिंद्रा यांना अटक केली  होती. या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचीही ईडीने चौकशी केली होती. प्रफुल्ल पटेल यांचे 'सीजे हाऊस'मध्ये दोन फ्लॅट आहेत. २००७ मध्ये 'सीजे हाऊस'च्या बांधकामासाठी एक करार झाला होता. त्यावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी आहे. मुळात प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोटेट केलेली कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात हा जमिनीचा व्यवहार झाला होता.संबंधित कागदपत्रांवर पटेल यांच्या स्वाक्षरी आहेत. मात्र ही मालमत्ता १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम. के. मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इकबाल याला विकण्यात आली असल्याचं सांगितलं. २००४ रोजी इकबाल मेमनसोबत जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व कागदपत्रं जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. जर इकबाल मेमनवर आरोप होते. तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांना दिली होती.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPraful Patelप्रफुल्ल पटेलRaj Kundraराज कुंद्रा