शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरण : प्रफुल पटेलांमागोमाग राज कुंद्रा ईडीच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 20:27 IST

अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागल्यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय उघड होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

ठळक मुद्दे ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावलं आहे. राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई - इकबाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्ता प्रकरणी ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावलं आहे. राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागल्यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय उघड होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.इकबाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघब्रिंद्रासोबत एक व्यावसायिक करार केला होता. रंजित ब्रिंदा हा इकबाल मिर्चीसाठी काम करतो. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशिलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्या संदर्भातील माहिती हाती लागली आहे. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. दरम्यान, २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं आहे. मात्र ४ नोव्हेंबर रोजी या व्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने राज कुंद्रा यांना समन्स जारी केले आहेत.

मिर्चीच्या वरळी येथील सीव्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन येथील १५३७ चौरस मीटर मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. या प्रकरणात ईडीने मिर्चीचे सहकारी हारून आलम युसूफ, रिंकू देशपांडे आणि रणजितसिंग बिंद्रा यांना अटक केली  होती. या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचीही ईडीने चौकशी केली होती. प्रफुल्ल पटेल यांचे 'सीजे हाऊस'मध्ये दोन फ्लॅट आहेत. २००७ मध्ये 'सीजे हाऊस'च्या बांधकामासाठी एक करार झाला होता. त्यावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी आहे. मुळात प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोटेट केलेली कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात हा जमिनीचा व्यवहार झाला होता.संबंधित कागदपत्रांवर पटेल यांच्या स्वाक्षरी आहेत. मात्र ही मालमत्ता १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम. के. मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इकबाल याला विकण्यात आली असल्याचं सांगितलं. २००४ रोजी इकबाल मेमनसोबत जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व कागदपत्रं जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. जर इकबाल मेमनवर आरोप होते. तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांना दिली होती.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई