शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या नवऱ्याची सतराशे साठ लफडी; आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 10:21 IST

या महिलेचा नवरा लखनऊचा रहिवासी असून ती २००९ बॅचचा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये आयपीएस अधिकाऱ्याचं माझ्यासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर अनेक महिलांसोबत पतीने संबंध ठेवले, फोनवरुन अश्लिल संभाषण करतो आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने अमित शहांना पत्र लिहून तक्रार केली

लखनऊ - यूपी केडरच्या आयपीएस अधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी स्वत: महिला अधिकारी असून सध्या ती दिल्लीत तैनात आहे. या महिला अधिकाऱ्याने आपल्या नवऱ्यावर आरोप करत त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत,  याशिवाय ते फोनवर महिलांशी अश्लिल बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ४ पानी पत्र लिहिले आहे. या पत्रासोबतच तिने पतीच्या महिलांसोबत अश्लील संभाषणाचे ५० पेक्षा जास्त चर्चेचे स्क्रिनशॉट्स पाठवले आहेत. याशिवाय महिलेने पेन ड्राईव्हमध्ये आयपीएस संभाषणाचा व्हिडिओही अमित शहा यांना पाठविला आहे. या पत्राची एक प्रत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि डीजीपी यांनाही पाठविली आहे.

या महिलेचा नवरा लखनऊचा रहिवासी असून ती २००९ बॅचचा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिकाऱ्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की, त्यांचे लग्न २०१४ मध्ये झालं होतं. लग्नानंतर तिचा नवरा झांसी, एटा, अयोध्या आणि मेरठ अशा अनेक शहरांमध्ये कार्यरत होता आणि येथेच त्याने वेगवेगळ्या महिलांशी संबंध निर्माण केले असा पत्नीचा आरोप आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवरील एका जिल्ह्यातील १८ वर्षीय तरुणीचे आपल्या पतीसोबत संबंध असल्याचे उघड झाले आहे. ज्यावेळी हे आय.पी.एस. अधिकारी त्याच जिल्ह्यात तैनात होता. त्यावेळी मुलगी आपल्या आईवडिलांसोबत एका केसच्या निमित्ताने एस.पी.( पौलीस अधिक्षक कार्यालय ) ऑफिसमध्ये आली होती. त्या दरम्यान, या दोघांची ओळख झाली. हळूहळू त्यांचे संबंध वाढत गेले. महिलेने आयपीएस पतीची ही चूक अनेक वेळा पकडली गेली परंतु कुटुंबासमोर त्याने आपली चूक मान्य करून लेखी माफी मागितली. तिचा नवरा सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहे आणि तपास एजन्सीच्या मुख्यालयात पोस्टवर कार्यरत आहे.

याठिकाणी एका घटस्फोटीत महिलेशी आयपीएस पतीने अनैतिक संबंध ठेवले आहेत. लग्नाच्या बहाण्याने त्या महिलेला आपल्यासोबत ठेवलं आहे. त्यामुळे पतीच्या वागणुकीला कंटाळून पत्नीने थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:च्या पतीवर गंभीर आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहा