शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एक लाखाचे बक्षीस असणाऱ्या ड्रग्ज तस्कराचा अटकेपूर्वी मृत्यू, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:25 IST

International drugs mafia david death : दिल्ली पोलीस दलाने ड्रग्ज तस्कराला अटक करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई - मुंबई बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली पोलीस दलाने ड्रग्ज तस्कराला अटक करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या ड्रग्ज पेडलर मागे दिल्लीपोलिसांनी एक लाखाचं बक्षीस घोषित केलं होतं. अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. मुंबईत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली पण त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी हेल्मेट घालून खिडकीतून दरवाजा आतून बंद करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र दोरी तुटल्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.  

मंगळवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांचे 3 अधिकारी ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस अंतर्गत गोरेगाव बांगूर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आरोपी डेव्हिड हरी राय (40) याच्या अटकेसाठी मुंबईत पोहोचले.  बांगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन डायरी बनवल्यानंतर दिल्ली पोलीस बांगूर नगर पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांसह एव्हरशाईन नगर येथील हरिद्वार अपार्टमेंटमध्ये आरोपीच्या घरी पोहोचले. पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपी डेव्हिड फ्लॅटच्या पाठीमागे बांधलेल्या खिडकीच्या तिसऱ्या मजल्यावर लटकलेल्या दोरीच्या साहाय्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र लटकण्याची दोरी कमकुवत झाल्याने खाली पडला. बराच वेळ डेव्हिडच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला.   जवळच्या रुग्णालयात पोलिसांनी त्याला दाखल केले .मात्र त्याचा मृत्यू झाला.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये डेव्हिड राय अंमली पदार्थांची विक्री आणि खरेदी प्रकरणात फरार होता. याशिवाय डेव्हिड रायवर अनेक गुन्हे दाखल आहेत.  दिल्ली पोलिसांनी दाऊदवर एक लाखाचे बक्षीसही जाहीर केले आहे.त्याचा मृत्यूनंतर बांगूर नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास मुंबई पोलीस व दिल्ली पोलीस करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस