अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. बोठेची सलग तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस चौकशी करत आहेत.जरे हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेला बोठे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात चौकशीसाठी त्याला वर्ग करून घेतले होते. तेथे त्याची पोलीस कोठडी संपल्याने तोफखाना पोलिसांनी पारनेर न्यायालय व जिल्हा न्यायालयात अर्ज करून बोठेची खंडणीच्या गुन्ह्यात चौकशी करायची असल्याने त्याला वर्ग करून घेतले. २८ डिसेंबरला बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
बाळ बोठेची सलग तिसऱ्या गुन्ह्यात चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 06:18 IST