शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दादा! ​​​​​​​ लक्ष ठेवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय! जळगावच्या ‘त्या’ घटनेच्या दोन दिवसांत चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 06:23 IST

गृहमंत्र्यांची घोषणा; कोणाचीही गय नाही असे आश्वासन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत केली.विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. भाजपच्या श्वेता महाले यांनी या घटनेकडे लक्ष वेधले. त्यांनी या घटनेत सामील अधिकारी, पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

त्यावर, गृहमंत्री देशमुख यांनी, ‘सरकारने या घटनेची नोंद घेतली’ असल्याचे सांगताच भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात अशी घटना घडते आणि मंत्री फक्त नोंद घेतात हा कुठला न्याय आहे. आताच्या आता कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कांचन पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. कांचन चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांची चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली आहे. ही समिती सर्व साक्षीपुरावे, परिस्थितीची तपासणी करून दोन दिवसांत अहवाल देईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींविरुद्ध कठोर कारवाई हाेईल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. 

‘लोकमत’चे कोण आहेत? लक्ष ठेवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय!दादा, ‘लोकमत’चे कोण आहेत? हे बघा आम्हाला बोलू दिलं जात नाही. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय, असे तक्रारदार मुलगी खिडकीतून ओरडून सांगत होती. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बोला, असे म्हणताच या मुलीला शासकीय वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांनी हात धरून खोलीत ओढले. ती खाली पत्रकारांशी बोलायला आली तेव्हाही तिला बोलण्यापासून रोखले.

 

टॅग्स :PoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुख