शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कतारमध्ये शिक्षा भोगतंय मुंबईतील निर्दोष दाम्पत्य; कारागृहातच दिला चिमुकलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 22:26 IST

Mumbai : एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे वाटणारी ही घटना मुंबईच्या मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कुरेशी या दाम्पत्यासोबत घडली आहे.

ठळक मुद्देकारागृहात जन्मलेली त्यांची मुलगी अयात एक वर्षाची झाली आहे.

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : लग्नाची भेट म्हणून काकीकडून कतारचे हनीमून पॅकेज मिळाले. दोघेही आनंदात कतारसाठी रवाना झाले. मात्र हे हनीमून पॅकेज त्यांचे आयुष्य बदलवेल याची पुसटशी कल्पना या दोघांनाही नव्हती. कतार विमानतळावर तपासणीत या दाम्पत्याजवळील पार्सलमध्ये ४ किलो चरस आढळल्याने दोघांनाही अटक झाली. याच गुन्ह्यात दाम्पत्याला १० वर्षाची शिक्षा सुनाविण्यात आली. कारागृहातच मुलीला जन्म दिला. विनाकारण शिक्षा भोगत असताना तब्बल वर्षभराने त्यांना अडकविणाऱ्याचा पर्दाफाश झाला आणि आता या दाम्पत्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) प्रयत्न सुरु केले आहेत. एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे वाटणारी ही घटना मुंबईच्या मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कुरेशी या दाम्पत्यासोबत घडली आहे. 

मुंबईकर असलेले कुरेशी दाम्पत्य उच्चशिक्षित आहे. गेल्या वर्षीच्या ६ जुलै रोजी कतारच्या दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ किलो चरससह या दाम्पत्याला पकडण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना १० वर्षाची शिक्षा सुनाविण्यात आली. विशेष म्हणजे, या काळात ओनीबा ही ३ महिन्याची गर्भवती होती. आपल्या मुलगी आणि जावयाला अडकवण्यात आल्याचा विश्वास असल्याने २७ सप्टेंबर रोजी ओनीबाचे वडील शकील अहमद कुरेशी यांनी एनसीबीकडे धाव घेत आपली मुलगी आणि जावई निर्दोष असून त्यांना यात अडकवल्याची तक्रार दिली. 

शकील यांनी नातेवाईक तबसुम रियाज कुरेशी आणि तिचा साथीदार निझाम कारा यांच्यामुळे ते यात अडकल्याचा दाट संशय व्यक्त केला होता. तबसुमने त्यांना लग्नाची भेट म्हणून कतारचे हनीमुन पॅकेज दिले. सोबत कतारच्या नातेवाईकांकडे देण्यासाठी एक पार्सल सोबत दिल्याचेही शकील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले. कतारला नवीन सीमकार्ड घ्यावे लागणार असल्याने तेथेच साधा फोन विकत घेणार असल्याने ठरवत दोघांनी त्यांचे मोबाईल घरीच ठेवले. याच मोबाईलमध्ये तबसुम, निझाम कारा यांच्यातील संवादाचे रेकॉर्डिंग कुरेशी यांनी एनसीबीकडे दिले आहे. 

कुरेशी यांच्या याच तक्रारीच्या आधारे एनसीबीचे क्षेत्रीय उपसंचालक के.पी.एस मल्होत्रा यांनी याप्रकारणाचा तपास सुरु केला. २२ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यांत निझाम कारा आणि तबसुमला १३ ग्रम कोकेनसह अटक केली. तर दुसरीकडे एनसीबीने ड्रग्ज रँकेट प्रकरणात १ किलो ४७४ किलो चरसच्या तस्करीत वेद राम, महेश्वर, शाहनवाज गुलाम चोराटवाला आणि शबाना चोराटवाला यांना बेडया ठोकल्या. त्यांच्या तपासात निझाम कारा आणि त्याची पत्नी शाहिदाने शाहनवाज आणि शबानाला ही ड्रग्ज दिल्याचे समोर आले. यासाठी निझामच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने हे पैसे पुरविल्याचे स्पष्ट झाले होते.

७ सप्टेंबर रोजी निझामला बेल मिळताच एनसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याच्यावर लक्ष ठेवले. अखेर १४ ऑक्टोबर रोजी निझाम कारा आणि शाहिदा त्यांच्या हाती लागले. त्यांच्या चौकशीत त्यांनीच तबसुम मार्फ़त कुरेशी दाम्पत्याला यात अडकवल्याचे स्पष्ट झाले. आणि चरसची बँग सोबत सोपवली. सध्या हाच धागा पकड़ून एनसीबी पथक कतार दुतावासाच्या मदतीने या जोडप्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. 

चिमुकली झाली १ वर्षाची यात कारागृहात जन्मलेली त्यांची मुलगी अयात एक वर्षाची झाली आहे. ती सध्या कतारमध्येच असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई