शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा आईचा दोरीने गळा आवळून पळाले', ५ वर्षाच्या निष्पाप मुलाने पोलिसांना सांगितली हकीकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 21:53 IST

Murder Case : घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांसोबतच मारेकरी पतीचाही शोध सुरू आहे.

कानपूरमधून एका खुनाची घटना समोर आली आहे. जिथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या निष्पाप मुलीसमोर ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांची दुरावस्था झाली आहे. आरोपीच्या शोधात पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्याहे प्रकरण नौबस्ता पोलीस स्टेशन हद्दीतील राजीव नगर भागातील आहे. जिथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा 5 वर्षांच्या निष्पाप मुलीसमोर गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. दोघांनाही अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची हाणामारी काही थांबली नाही.५ वर्षाच्या मुलीच्या समोरच खून5 वर्षीय निष्पाप मुलीने पोलिसांना सांगितले की, काल (शनिवारी) वडील आणि आईमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर वडिलांनी दोरीने आईचा गळा आवळून पळ काढला. त्याचवेळी हत्येचे वृत्त पसरताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांसोबतच मारेकरी पतीचाही शोध सुरू आहे.पोलीस आरोपीच्या शोधातयाप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्या व्यक्तीने पत्नीचा गळा दाबून खून केला. आरोपीचा शोध सुरू असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.पोलिसांचे म्हणणे आहे की, हे कुटुंब भाड्याच्या घरात राहते, त्यांना दोन मुले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस