शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये दोन अल्पवयीन मुलांना नग्न करून केली अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 01:18 IST

लाथा-बुक्क्या, काठीने या मुलांच्या पायावर, हातावर, डोक्यात, पोटात, इतकेच नव्हे, तर गुप्तांगावरही मारहाण करण्यात आली. 

अंबरनाथ : अवघ्या १२ ते १३ वर्षांच्या दोन लहान मुलांना नग्न करून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकाराचा व्हिडीओ आता उघड झाला असून, या प्रकारामुळे अंबरनाथ शहरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथच्या पश्चिम भागातील चिंचपाडा खदान परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. बाबू गुंडे ऊर्फ खोपडी या विक्षिप्त व्यक्तीने मुलींची छेड काढण्याच्या संशयावरून तीन लहान मुलांना नग्न करून मारहाण केली. तसेच त्यांना नग्नावस्थेत परिसरातून चालत घरी पाठवले. यातल्या एका लहान मुलाला तर त्याने काठीने अमानुष मारहाण केली. 

लाथा-बुक्क्या, काठीने या मुलांच्या पायावर, हातावर, डोक्यात, पोटात, इतकेच नव्हे, तर गुप्तांगावरही मारहाण करण्यात आली. यावेळी हा मुलगा गयावया करत मारू नका, अशी विनवणी करत होता. तर बाबू याचा एक साथीदार मात्र या सगळ्याचं चित्रीकरण करत होता. बाबू याने इतक्यावरच न थांबता या मुलाला कपडे काढायला लावत नग्न अवस्थेत तो राहत असलेल्या परिसरापर्यंत चालवत नेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथ शहरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. 

टॅग्स :ambernathअंबरनाथPoliceपोलिस