शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

पोलिसांकडून रिक्षाचालकाला अमानुष मारहाण; तळीरामांना पळवताना घडला प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 21:29 IST

घणसोलीतला प्रकार

नवी मुंबई : मद्यविक्री केंद्राबाहेरील जमाव पांगवताना पोलिसांनी रिक्षाचालकाला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये रिक्षाचालकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मद्यविक्री केंद्राबाहेर हा प्रकार घडला आहे. 

नवी मुंबईत लॉकडाऊन असल्याचे अफवांचे पीक रविवारी उठले होते. यामुळे तळीरामांनी परिसरातल्या मद्यविक्री केंद्रांबाहेर गर्दी केली होती. अशाच  रेल्वेस्थानकासमोरील मद्यविर्क्री केंद्राबाहेर मोठ्या संख्येने ग्राहकांची गर्दी झाली होती. मागील अनेक दिवसांपासून शहरातील बहुतांश मद्यविक्री केंद्राबाहेरच सर्रास मद्यविक्री होत आहे. त्यानुसार याठिकाणी देखील ग्राहकांनी गर्दी केली होती. परंतु पोलिसांना माहिती मिळताच एक पथक त्याठिकाणी आले असता, जमावाने पळ काढला. यावेळी पोलिसांकडून सरसकट तिथे दिसणाऱ्यांवर लाठीचार्ज होत असताना एका रिक्षाचालकांच्या डोक्यावर काठी लागली. यामध्ये तो रक्तबंबाळ झाला.

सदर रिक्षाचालक भाडे घेऊन त्याठिकाणी आला होता असे समजते. त्याने पोलिसांकडून कमरेच्या वर झालेल्या हल्ल्यावर आक्षेप घेतला असता जमलेल्या जमावाने देखील पोलिसांच्या कृत्याविषयी नाराजी व्यक्त केली.  यावेळी उपस्थित काही व्यक्तींनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

घटनास्थळापासून काही अंतरावरच लॉकडाऊन असताना देखील नियमित चायनीस सेंटर चालवले जात आहेत. त्यासंदर्भात अनेकांनी तक्रारी देखील केल्या आहेत. यानंतरही त्यावर पोलीस कारवाई का करत नाहीत असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर मद्यविक्रेत्यांकडून ऑनलाईन ऐवजी थेट अर्धवट शटर उघडे ठेवून मद्यविक्री होत असतानाही त्यांना पाठीशी घालण्यामागच्या कारणांवर देखील शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकावर झालेल्या हल्याप्रकरणी चौकशीची मागणी रिक्षाचालकांकडून होत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई