Bihar Crime: सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणे एका महिलेला आणि तिच्या पतीला चांगलेच भोवले आहे. बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी असतानाही, सार्वजनिकपणे दारूचे प्रदर्शन केल्यामुळे बिहार पोलिसांनी कंचन देवी आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोज डे निमित्ताने कंचन देवीने तिच्या पतीसाठी केलेल्या रीलमुळे ती अडकली.
नेमकं प्रकरण काय?
व्हॅलेंटाईन वीकच्या रोज डे निमित्त कंचन देवी या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये ती आपल्या पती राहुल कुमारला आधी गुलाबाचे फूल देते आणि त्यानंतर मोठ्या अभिमानाने दारूची बाटली आणि ग्लास हातात सोपवते. बिहारसारख्या कडक दारूबंदी असलेल्या राज्यात हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि थेट पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचला.
दुसऱ्या व्हिडिओने वाढवल्या अडचणी
दारूच्या व्हिडिओनंतर कंचन देवीचा आणखी एक पराक्रम समोर आला. एका ब्यूटी पार्लरमध्ये बसून ती हातात पिस्तूल घेऊन भोजपुरी गाण्यावर रील करताना दिसली. हा व्हिडिओ समोर येताच मुंगेरचे पोलीस अधीक्षक सय्यद इम्रान मसूद यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष पथक स्थापन केले आणि महिलेच्या घरावर छापा टाकला.
परवानाधारक शस्त्राचा गैरवापर
पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, व्हिडिओमध्ये दिसणारे पिस्तूल हे दीनदयाल चौक येथील रहिवासी विशाल कुमार यांचे आहे. जरी हे शस्त्र परवानाधारक असले, तरी ते कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला हाताळायला देणे किंवा त्याचे सोशल मीडियावर दाखवणे हा कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता शस्त्र मालक विशाल कुमार यालाही सहआरोपी केले आहे.
पोलिसांची कडक भूमिका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंचन देवी, तिचा पती राहुल आणि शस्त्र मालक विशाल कुमार या तिघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. कंचनचे इंस्टाग्रामवर सुमारे २.९९ लाख फॉलोअर्स आहेत. "दारूबंदी असलेल्या राज्यात प्रतिबंधित पदार्थांचे प्रमोशन करणे हा गंभीर गुन्हा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सोडणार नाही, असाही इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला.
Web Summary : Bihar influencer arrested after posting a video offering her husband liquor on Rose Day, violating prohibition laws. She also filmed a reel with a pistol. Police seized the weapon and arrested her along with her husband and the weapon's owner.
Web Summary : बिहार में रोज डे पर पति को शराब पिलाने और पिस्तौल के साथ रील बनाने वाली इन्फ्लुएंसर गिरफ्तार। शराबबंदी कानून का उल्लंघन और अवैध हथियार प्रदर्शन का मामला। पुलिस ने पति और हथियार मालिक को भी गिरफ्तार किया।