शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अल्पवयीन साथीदारांनीच केला कुख्यात इंदलचा गेम : नागपुरात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 22:24 IST

Murder, crime news उत्तर नागपुरातील टॉप टेन गुन्हेगारांपैकी एक असलेला कुख्यात इंदल ऊर्फ इंद्रजित विक्रम बेलपारधी (वय ३५) याची हत्या करणारे त्याचेच जुने साथीदार निघाले. वयाची १८ वर्षे पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक असलेल्या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देमारहाणीचा वचपा काढला - दोन आठवड्यांपासून तयारीत होते

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उत्तर नागपुरातील टॉप टेन गुन्हेगारांपैकी एक असलेला कुख्यात इंदल ऊर्फ इंद्रजित विक्रम बेलपारधी (वय ३५) याची हत्या करणारे त्याचेच जुने साथीदार निघाले.  वयाची १८ वर्षे पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक असलेल्या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना दुचाकीचा कट लागला होता, त्यामुळे आरोपींचा इंदलसोबत वाद झाला. त्या वादातून त्यांनी इंदलची हत्या केल्याची माहिती पाचपावली पोलीस सांगत आहेत. मात्र, हे अर्धसत्य असल्याची चर्चा आहे. कुख्यात इंदल गेल्या अनेक वर्षांपासून पाचपावलीत बेदरकारपणे जुगार अड्डा चालवित होता. त्याने दोघांची हत्या केली होती. इतरही अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने उत्तर नागपुरातील गुन्हेगारी वर्तुळात इंदलचा मोठा दरारा होता. पोलिसांना मोठी देण देऊन इंदल बेदरकारपणे जुगार अड्डे चालवायचा. इंदलच्या जुगार अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने मोठ्या संख्येत जुगारी त्याच्याकडे हजारोंचा डाव खेळायला येत होते. त्यातून इंदलला हजारोंची नाल (कट्टा) मिळत होता. जुगार अड्ड्यावर त्याने अनेक अल्पवयीन मुले ठेवली होती. ते मुखबिरी आणि आर्थिक व्यवहार सांभाळत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, इंदलच्या अड्ड्यावरच हे दोघे आरोपी काम करायचे. त्यांनी पैशाची अफरातफर केल्याने इंदलने त्यांची बेदम धुलाई केली होती. त्यामुळे ते सुडाने पेटले होते. या पार्श्वभूमीवर, त्यांनी रविवारी रात्री दारूच्या नशेत टुन्न असलेल्या इंदलला घेरले अन् तलवार तसेच चाकूचे सपासप घाव घालून त्याचा गेम केला.

२० पेक्षा जास्त घाव

इंदल क्रूर स्वभावाचा होता. तो वाचला तर जिवंत सोडणार नाही, हे माहीत असल्याने आरोपींनी इंदलवर आधी तलवारीने घाव घालून त्याला हतबल केले आणि खाली कोसळताच त्याच्या शरीराला चाकूने भोसकले. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी इंदलवर २० पेक्षा जास्त घाव घातले. विशेष म्हणजे, या हत्याकांडात हे दोनच आरोपी असल्याचे पाचपावली पोलीस सांगत आहेत. मात्र, त्यांना पुढे करून सराईत गुन्हेगारांनी इंदलचा गेम केल्याची जोरदार चर्चा आहे.

‘सैया भये कोतवाल, फिर डर काहे का’

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे कडक निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. त्या भागातील गुन्हेगारांवर खास नजर ठेवण्याचेही सांगितले आहे. मात्र, पाचपावलीतील अनेक कुख्यात गुन्हेगार मोकाट आहेत. जुगार अड्डे, दारूचे गुत्ते, मटका अड्ड्यांसह अनेक अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहेत. ‘सैया भये कोतवाल, फिर डर काहे का’ अशा अविर्भावात पाचपावलीत अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी पाचपावली पोलीस ठाण्याकडे कसे लक्ष घालतात, त्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर