शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार कोण?"; दूषित पाण्याने घेतला ४ मुलींच्या वडिलांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:57 IST

दूषित पिण्याच्या पाण्यामुळे पसरलेल्या उलट्या आणि जुलाबाच्या साथीने ५० वर्षीय ई-रिक्षा चालकाचा बळी घेतला आहे.

इंदूरच्या भागीरथपुरा भागात दूषित पिण्याच्या पाण्यामुळे पसरलेल्या उलट्या आणि जुलाबाच्या साथीने ५० वर्षीय ई-रिक्षा चालकाचा बळी घेतला आहे. या घटनेसह स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत या साथीमुळे २५ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने १५ जानेवारी रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात सादर केलेल्या अहवालात, भागीरथपुरा येथील साथीमुळे एका पाच महिन्यांच्या बालकासह केवळ सात जणांचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे.

दूषित पाण्यामुळे हेमंत गायकवाड यांच्या मृत्यू झाला आहे. त्यांना चार मुली आहेत. हेमंत यांच्या मृत्यूनंतर पतीच्या निधनाने खचलेली पत्नी, चार मुली आणि वृद्ध माता यांना सावरणं उपस्थितांसाठी कठीण झालं होतं. हेमंत यांचे भाऊ संजय म्हणाले, "माझ्या भावाचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला आहे. अवघ्या १५ दिवसांच्या आजारपणात आम्ही त्याला गमावलं. मंगळवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला."

"गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे"

हेमंत हे ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एकमेव कमावते सदस्य होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असून राज्य सरकारने त्यांना शक्य ती सर्व मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. "माझ्या भावाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे" असं देखील संजय यांनी म्हटलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

"माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार कोण?” 

हेमंत यांची मुलगी रिया म्हणाली, "बाबांना दूषित पाण्यामुळे जुलाब होण्याचा त्रास सुरू झाला होता. आम्ही त्यांना सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे त्यांचा मृत्यू झाला. माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार कोण?" भागीरथपुरा येथील रहिवाशांना गेल्या दोन वर्षांपासून दूषित पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही या समस्येचे निराकरण झालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Contaminated water claims father of four; Who is responsible?

Web Summary : Contaminated water in Indore's Bhagirathpura caused the death of a 50-year-old e-rickshaw driver, leaving behind his wife and four daughters. Locals claim 25 deaths, while the government reports seven. The family demands justice and accountability for the tragedy.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीDeathमृत्यू