MP HoneyTrap Case: सोशल मीडिया आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून जाळ्यात ओढून प्रतिष्ठित नागरिकांना लुटणाऱ्या एका हनी ट्रॅप टोळीचा इंदौर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका माजी सैनिकाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या टोळीच्या अंगलट आला असून, पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली. या टोळीने केवळ काही तासांतच एका व्यापाऱ्यालाही लुटल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
माजी सैनिकाला लुटले
बडगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या माजी सैनिकाला भावना भार्गव नावाच्या तरुणीने जुनी ओळख असल्याचे सांगून संपर्कात ओढले. काही दिवस गोड बोलून विश्वास संपादन केल्यानंतर, तिने त्यांना केलोद येथील रेनबो फार्म हाऊसवर भेटायला बोलावले. माजी सैनिक तिथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेले भावनाचे साथीदार साधना गुप्ता आणि विजय तिलवारे तिथे आले. त्यांनी माजी सैनिकावर अश्लील कृत्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली आणि दोन लाख रुपयांची मागणी केली.
ऐनवेळी पोलिसांची एन्ट्री अन् तिघे गजाआड
धमकावण्याचा हा प्रकार सुरू असतानाच, पोलिसांना या संशयास्पद हालचालींची कुणकुण लागली. पोलिसांनी तातडीने फार्म हाऊसवर धाड टाकून भावना भार्गव, साधना गुप्ता आणि विजय तिलवारे या तिघांना रंगेहाथ अटक केली. धक्कादायक म्हणजे, या अटकेच्या अवघ्या तीन तास आधीच याच टोळीने इंदौरमधील एका व्यापाऱ्याला अशाच प्रकारे जाळ्यात ओढून २८ हजार रुपये उकळले होते.
टोळीत वकिलाचाही सहभाग?
पोलीस तपासात या टोळीची काम करण्याची पद्धत समोर आली आहे. ही टोळी डेटिंग अॅप्स आणि सोशल मीडियावरून श्रीमंत लोकांचे नंबर मिळवत होती. त्यानंतर महिला सदस्य त्यांना भेटायला बोलावून ट्रॅपमध्ये अडकवत. पीडित व्यक्तीला अधिक घाबरवण्यासाठी या टोळीत एका वकिलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हा वकील थेट पोलीस ठाण्यात पोहोचून पीडित व्यक्तीला कायदेशीर कारवाईची भीती दाखवून तडजोड करण्यास भाग पाडत असे.
फार्म हाऊस सील; चालकावरही गुन्हा
ज्या रेनबो फार्म हाऊसवर हा सगळा काळा धंदा सुरू होता, त्या विरोधातही पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. फार्म हाऊसवर येणाऱ्यांची कोणतीही नोंद न ठेवता, ओळखपत्र घेता प्रवेश दिला जात होता. त्यामुळे पोलिसांनी फार्म हाऊस सील केले आणि चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
अनेकजण गप्प
आरोपींचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर आणखी एका पीडिताने पोलिसांशी संपर्क साधला असून, लसूडिया परिसरात त्याला २७ हजारांना लुटल्याची तक्रार केली. "अनेक प्रतिष्ठित नागरिक बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, या टोळीने अनेकांना लुटले असण्याची शक्यता आहे," असे पोलिसांनी सांगितले. पोलीस आता आरोपींचे सीडीआर आणि मोबाईल डेटा तपासत असून सायबर सेलच्या मदतीने या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Web Summary : Indore police busted a honey trap gang using dating apps to extort money. They lured a former soldier, but were caught extorting a businessman. The gang included a lawyer threatening victims. The farmhouse used was sealed, and the driver charged.
Web Summary : इंदौर पुलिस ने डेटिंग ऐप्स का उपयोग करके पैसे वसूलने वाले एक हनी ट्रैप गिरोह का भंडाफोड़ किया। उन्होंने एक पूर्व सैनिक को फंसाया, लेकिन एक व्यापारी से उगाही करते हुए पकड़े गए। गिरोह में एक वकील भी शामिल था जो पीड़ितों को धमकाता था। इस्तेमाल किया गया फार्महाउस सील कर दिया गया, और ड्राइवर पर आरोप लगाया गया।