शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने मतदार स्लिप मागितल्याने पती संतापला अन् दिला तिहेरी तलाक, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 19:43 IST

indore case : याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. हे प्रकरण इंदूरच्या एमआयजी कॉलनीमधील आहे.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने पतीकडे मतदार स्लिप मागितली असता तिने महिलेला तीनदा तलाक म्हणत वैवाहिक संबंध संपुष्टात आणले. आता याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. हे प्रकरण इंदूरच्या एमआयजी कॉलनीमधील आहे. याप्रकरणी इंदूरच्या एमआयजी कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने पतीविरोधात पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मतदानाच्या दिवशी पतीने तिला मतदानाचा अधिकार नाकारल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच, बीएलओने मतदानाची स्लिप पती राहत असलेल्या घरी पाठवल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

ही महिला गेल्या 4 महिन्यांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत होती. मात्र, मतदानाची स्लिप पती राहत असलेल्या घरी होती. त्यामुळे महिलेने पतीच्या घरी जाऊन पतीकडे मतदानाची स्लिप मागितली. यावेळी महिलेला पाहून पतीने तिहेरी तलाक म्हणत वैवाहिक संबंध संपवले. 

दरम्यान, पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे. पत्नीने फ्लॅट आपल्या नावावर करावा अशी पतीची इच्छा होती. माझा फ्लॅट नावावर करण्यासाठी पती सतत माझ्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

याप्रकरणी महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत इंदूरचे आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. एमआयजी स्टेशन प्रभारी अजय वर्मा वस्तुस्थितीच्या आधारे तपास करत आहेत. 

तसेच, पोलीस सध्याच्या आणि मागील प्रकरणांचा तपास करत आहेत. मात्र, तिहेरी तलाकचे खरे प्रकरण काय आहे? आणि त्यामागचे मुख्य कारण म्हणजे मतदानाची स्लिप आहे किंवा घरातील वाद आहे, हे तपासानंतर स्पष्ट होईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश