शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

भारतातील सर्वात मोठ्या गन लायसेंस घोटाळ्याचा खुलासा, अनेक जिल्हाधिकारी सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 11:02 IST

Gun License Scam: घोटाळ्याचा खुलासा सर्वात आधी 2017 मध्ये राजस्थान दहशतवादी विरोधी पथकाने केला होता

ठळक मुद्दे 2018 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल एनएन वोहरा यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

नवी दिल्ली: बंदुक परवाना(Gun Liacence) रॅकेटचा तपास करणाऱ्या सीबीआयने शनिवारी मोठा खुलासा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी गन डीलर्ससोबत मिळून 2012 पर्यंत 2.78 लाखांपेक्षा जास्त अवैध गन लायसेंस जारी केले. सीबीआयने याला भारतातील सर्वात मोठा गन लायसेंस घोटाळा म्हटले आहे.

याबाबत सीबीआयने सांगिले की, त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गन लायसेंस रॅकेटशी संबंधित एका प्रकरणात 20 गन हाउससह 40 ठिकाणांवर छापेमारी केली होती. यात दोन आयएएस अधिकारी शाहिद इकबाल चौधरी आणि नीरज कुमार यांच्या ठिकाणांवरही छापेमार झाली. चौधरी सध्या आदिवासी प्रकरणांचे सचिव आहेत. तसेच, ते यापूर्वी जम्मू आणि काश्मीरच्या सहा जिल्ह्यात जिल्हा मजिस्ट्रेट पदावर कार्यरत होते. याशिवाय, मागच्या वर्षी मार्च महिन्यात सीबीआयने आयएएस अधिकारी कुमार राजीव रंजन आणि इतरत रफीकी यांना अटक केली होती. त्यांच्यावर कुपवाडा जिल्हा मजिस्ट्रेट पदावर असताना हजारो लायसेंस जारी केल्याचा आरोप आहे.

2017 मध्ये मिळाली घोटाळ्याची माहितीया घोटाळ्याची माहिती पहिल्यांदा 2017 मध्ये राजस्थान दहशतवाद विरोधी पथकाने समोर आणली होती. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या बंदुकांसह काही आरोपींना पकडले होते. त्या आरोपींकडून जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी भारतीय जवानांच्या नावे जारी केलेले गन लायसेंसदेखील मिळाले होते. अधिकाऱ्यांनी त्या आरोपींकडून जवळपास तीन हजार लायसेंस जप्त केले होते. यानंतर 2018 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल एनएन वोहरा यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCBIगुन्हा अन्वेषण विभागRajasthanराजस्थान