शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय कॉलला दिसायचा भारतीय नंबर, बेकायदा ‘कॉल राउंटिंग’चे पाेलिसांनी उधळले रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 10:35 IST

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल याच कंपनीमार्फत आल्याचेही समोर आले आहे.

नवी मुंबई : वेगवेगळ्या देशांतून भारतात येणाऱ्या कॉलचे बेकायदेशीर राउंटिंग करणाऱ्या कॉल सेंटरचा काळा धंदा गुन्हे शाखा पोलिसांनी उघड केला. दूरसंचार विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून शासनाचा महसूल बुडवून हे कॉल सेंटर चालवले जात होते. त्याची माहिती मिळताच दोन महिन्यांच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त करून चौघांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील काही व्यक्तींना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांनी कॉल केल्यास मोबाईलवर भारतातील नंबर दिसत असल्याच्या काही तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनला मिळाल्या होत्या. त्यांच्याकडून वापरले जाणारे सर्व्हर नवी मुंबई परिसरात असल्याने डॉटने याबाबत नवी मुंबई गुन्हे शाखेला कळवले होते. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे व कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक तयार केले होते.

त्यांच्याकडून चाललेल्या सुमारे दोन महिन्यांच्या तपासानंतर चौघांना अटक करून त्यांच्यामार्फत चालणारे बेकायदेशीर कॉल सेंटर उघडकीस आणले आहे.सूरज वर्मा, अनुप वर्मा, साजिद सय्यद व अब्दुल फिरोजाबादी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे इतर साथीदार व मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.

शासनाचे तीन कोटी बुडविलेकाही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल याच कंपनीमार्फत आल्याचेही समोर आले आहे. परंतु हे रॅकेट उघड होऊ शकले नव्हते. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हेगारांचा शोध घेऊन हे रॅकेट उघड केले आहे. त्यांच्यावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भामट्यांनी काही महिन्यांत शासनाचा तीन कोटींहून अधिक महसूल बुडवला आहे.

अशी हाेती मोडस ऑपरेंडीदूरसंचार विभागाच्या नियमावलीनुसार वेगवेगळ्या देशातून नेटवर्क कंपन्यांमार्फत भारतात थेट कॉल येत असतात. त्याची नोंद होत असते. शिवाय त्यामार्फत शासनालादेखील महसूल मिळत असतो. परंतु, अटक केलेल्या चौघांनी त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून ग्लोबल इंटरप्रायजेस नावाची कंपनी सुरू केली होती. तिच्या माध्यमातून त्यांनी विदेशातल्या काही कंपन्यांसोबत व्यवहार ठरवून भारतात येणारे कॉल थेट न जाऊ देता त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाठवले जात होते. यासाठी ग्लोबल इंटरप्रायजेसने एका नेटवर्क कंपनीचे सुमारे बाराशे नंबर घेतले होते.त्याद्वारे विदेशातून भारतीयांना येणारे कॉल इंटरनेटच्या माध्यमातून बाराशेपैकी कोणत्याही नंबरवरून पुढे पाठवला जायचा. त्यामुळे भारतीयांना त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल येऊनदेखील नंबर मात्र भारतातीलच दिसत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी