शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

इंदापूर हादरलं! जन्मदात्या पित्यानेच केली दोन महिन्याच्या चिमुकलीची नाक व गळा दाबून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 13:23 IST

दोन महिन्यांपूर्वी जन्मलेली मुलगी माझी नाही असे सांगत पत्नी सोनम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली.

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. ऊस तोडणीसाठी आलेल्या एका कुटुंबातील पती पत्नीत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून निर्दयी जन्मदात्या पित्याने आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा नाक व गळा दाबून निर्दयीपणे हत्या केल्याची घटना आली आहे.  याप्रकरणी चिमुकलीची आई सोनम शक्तिमान काळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सकटया उर्फ शक्तिमान काळे असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे ऊस तोडणीसाठी शक्तिमान काळे व त्याचे कुटुंब आले होते. आरोपीचे 22 नोव्हेंबरला  सोनम यांच्यासोबत भांडणे झाली. त्यात. दोन महिन्यांपूर्वी जन्मलेली मुलगी माझी नाही असे सांगत आणि आज तू ऊसाच्या मोळ्या बांधायला का आली नाहीस याचा जाब विचारत पत्नी सोनम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. तसेच दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी काळे याने आपल्या चिमुरडीचे तोंड आणि नाक दाबत असतानाच बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सोनम यांना जाग आली. यावेळी त्यांनी घराबाहेर येत आरडाओरडा केला. इतर ऊस तोडणी कामगार मदतीला येईपर्यंत काळे फरार झाला होता. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर सोनम यांना या घटनेचा जबर धक्का बसला.व त्यांनी शुक्रवारी     इंदापूर पोलिस ठाण्यात पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.

इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी पुढील तपास करत आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरMurderखूनPoliceपोलिसArrestअटक