शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीत वाढले अमली पदार्थांचे व्यसन, पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:56 IST

टाळेबंदीच्या काळात जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. सतत घरी राहून चिडचिडेपणा आला आहे. भूक मंदावणे, झोप कमी लागणे आदी तक्रारी वाढू लागल्या आहेत.

नवी मुंबई -  कोरोनामुळे लागू केलेल्याटाळेबंदीच्या काळात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे युवकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांना केले आहे.टाळेबंदीच्या काळात जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. सतत घरी राहून चिडचिडेपणा आला आहे. भूक मंदावणे, झोप कमी लागणे आदी तक्रारी वाढू लागल्या आहेत. याचा नेमका फायदा अमली पदार्थ विक्रेत्यांनी घेतला आहे. चिंता व नैराश्य घालविण्यासाठी तरुण विविध पर्यायांचा शोध घेताना दिसत आहे. ही बाब अमली पदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. सैरभैर झालेल्या तरुणवर्गाला विविध मार्गाने आकर्षित करून त्यांना अमली पदार्थांची सवय लावली जात आहे. त्यामुळे या कोरोनाच्या काळात अमली पदार्थांची विक्री व सेवन यात वाढ झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी शहरवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.टाळेबंदीच्या काळात पान, बिडी, सिगारेट, तसेच मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे या गोष्टींचे व्यसन असणाऱ्यांची पंचाईत झाली होती. टाळेबंदीतही तबांखूजन्य पदार्थ, दारूची तिप्पट दराने विक्री होत होती. त्यामुळे अनेकांनी या व्यसनाला फाटा दिला, परंतु त्याच वेळी तंबाखूजन्य पदार्थापेक्षा कमी दरात अमली पदार्थ उपलब्ध करून देण्याची शक्कल काही ड्रग्ज माफियांनी लढविली. महागड्या तंबाखूजन्य पदार्थापासून दूर गेलेल्या युवकांना एमडी, गांजा आदी अमली पदार्थ स्वस्त व सहज उपलब्ध करून देण्यात ड्रग्ज माफिया यशस्वी झाले.अमली पदार्थांमुळे भूक वाढते, एकाग्रता वाढते, अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे, तसेच कोणीही अमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी युवकांना केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड