शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूनम पांडेच्या अडचणीत वाढ; गोवा पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:44 IST

Poonam Pandey : कानाकोण भागातील सरकारी चापोली धरणावर अश्लील व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल नोव्हेंबर 2020 मध्ये पांडे आणि बॉम्बे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पणजी :  प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. गोवा पोलिसांनीपूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांच्याविरुद्ध अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण 2020 चे आहे. अश्लीलता, अनधिकृत प्रवेश आणि अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याशी संबंधित विविध कलमांतर्गत कानाकोण न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांच्यासमोर गेल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, असे कानाकोण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण गवस यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले.

कानाकोण भागातील सरकारी चापोली धरणावर अश्लील व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल नोव्हेंबर 2020 मध्ये पांडे आणि बॉम्बे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर दोघांना अटक करून नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ३९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे गवस यांनी सांगितले.पतीविरुद्ध मारहाणीचा गुन्हावादांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडेने नोव्हेंबर 2021 मध्ये पती सॅमवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी सॅमलाही अटक केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूनम पांडेलाही काही गंभीर दुखापत झाली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. याआधीही पूनमने सॅमवर मारहाणीचा आरोप केला होता.2020 मध्ये लग्न झालेपूनम आणि सॅमचे सप्टेंबर २०२० मध्ये लग्न झाले. लग्नानंतर लगेचच पूनमने पतीवर मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये समेट झाला होता. मात्र नंतर त्यांचे नाते पुन्हा बिघडले.

टॅग्स :Poonam Pandeyपूनम पांडेPoliceपोलिसCourtन्यायालयgoaगोवा